अक्षय बडवे, साम टीव्ही
Pune MPSC Girl Case Updates: एमपीएससी टॉपर दर्शना पवार हत्या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी राहुल हंडोरे याची न्यायालयाने सोमवारी (४ जुलै) येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी राहुल हंडोरे याला न्यायालयासमोर हजर केले होते. आता न्यायालयाने त्याची कारगृहात रवानगी केली आहे.
लग्नाच्या कारणावरून वाद झाल्याने राहुल हंडोरे याने एमपीएससी परीक्षा (MPSC Exam) पास झालेल्या दर्शना पवारची हत्या केली होती. १८ जून रोजी दर्शना पवारचा मृतदेह पोलिसांना राजगडाच्या पायथ्याशी आढळून आला होता. दर्शनाचा मित्र राहुल यानेच तिची हत्या केल्याचं निष्पन्न होता पोलिसांनी त्याला अटक केली होती.
दर्शनाने विवाहास नकार दिल्याने तिच्या गळ्यावर कंपासमधील कटरने वार करून खून (Crime News) केल्याची कबुली हंडोरेने दिली होती. राहुल हंडोरे याने दर्शनाची हत्या केल्याचं उघड होताच राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, न्यायालयाने हंडोरेला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.
आता राहुल हंडोरे याच्या पोलीस (Police) कोठडीची मुदत सोमवारी संपली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने हंडोरेला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार हंडोरेची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली.
आरोपी राहुल हंडोरे आणि मृत दर्शना पवार यांची लहानपणापासूनच ओळख होती. मामाच्या घराशेजारी राहत असल्याने दर्शना आणि त्याची लहानपणापासूनच मैत्री होती. राहुल हा ४ ते ५ वर्षांपासून एमपीएससी परीक्षेची तयारी करत होता. स्वत:चा खर्च चालवण्यासाठी अनेकवेळा डिलीवरी बॉय म्हणून राहुल काम करत होता. कधी कुठे पार्टटाईम जॉब करत होता.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.