MPSC  Saam Tv
मुंबई/पुणे

MPSC विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! जागा थेट २६५ वर; 'या' दोन मोठ्या पदांचा समावेश

MPSC Recruitment Update : एमपीएससी राज्य सेवा परीक्षेच्या पदसंख्येत मोठी वाढ करण्यात आली आहे. ८७ जागांवरून थेट २६५ जागांसाठी भरती होणार असून DySP, BDO आणि इतर महत्त्वाच्या पदांचा समावेश करण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

MPSC 265 posts, DySP BDO recruitmen Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या स्पर्धा परीक्षार्थींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. एमपीएससीने नागरी सेवा परीक्षेच्या (MPSC State Services Exam) एकूण पदसंख्येत मोठी वाढ केली आहे. सुधारित पत्रकानुसार, आता ८७ वरून तब्बल २६५ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

याआधी एमपीएससीने नागरी सेवा परीक्षेसाठी केवळ ८७ जागांची जाहिरात प्रसिद्ध केली होती. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये काहीसा नाराजीचा सूर होता. मात्र, आता यामध्ये सुधारणा करण्यात आली असून जागांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. ८७ जागांवरून आता थेट २६५ वर जागा वाढवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या संदर्भातील अधिकृत प्रसिद्धीपत्राक जारी करून ही माहिती दिली आहे. त्याशिवाय MPSC कडून ही माहिती एक्स खात्यावरही पोस्ट करण्यात आली आहे.

वाढवण्यात आलेल्या नव्या पदसंख्येमध्ये प्रशासनातील अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि महत्त्वाच्या पदांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पोलीस उपअधीक्षक (DySP) आणि गटविकास अधिकारी (BDO) यासारख्या पदांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याशिवाय अनेक वर्ग-१ आणि वर्ग-२ च्या पदांचा समावेश आहे. मात्र, यंदाही 'उपजिल्हाधिकारी' (Deputy Collector) पदाचा या वाढीव जागांमध्ये समावेश करण्यात आलेला नाही, याबाबतची माहिती समोर आली आहे.

जागांमध्ये झालेल्या या मोठ्या वाढीमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून अहोरात्र अभ्यास करणाऱ्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यातील स्पर्धेला आता नवा हुरूप येणार आहे. वाढलेल्या जागांबाबत एमपीएससीकडून सोशल मीडियावर माहिती देण्यात आली आहे. त्याशिवाय संकेतस्थळावर सविस्तर माहिती उपलब्ध असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार, भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

Maharashtra News Live Update: विरार-नालासोपारा जाणाऱ्या रस्त्यावर गणेश मंडळाची गणेशमूर्ती कोसळली

राजकीय भूकंप होणार! सत्ताधारी भाजपमधील अनेक नेते पक्षाला ठोकणार 'रामराम'; बड्या नेत्याच्या काँग्रेस प्रवेशानंतर चर्चांना उधाण

15 सप्टेंबरला जरांगे अंतरवालीतून निघणार, 19 सप्टेंबरला आझाद मैदानावर धडकणार

Crime: मुलावर जादुटोणा केल्याचा संशय, सासऱ्याने सुनेला जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT