Sport News Saam Tv
मुंबई/पुणे

Sport News : राज्यातील कुस्ती खेळाडूंना मोठं गिफ्ट; क्रीडा विभागाने घेतला मोठा निर्णय

आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदकांची संख्या वाढविण्यासाठी महत्त्वाचा निर्णय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

Latest Sport News : राज्यातील कुस्ती खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑलिम्पिक सारख्या विविध स्पर्धा आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून पदकांची संख्या वाढविण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. कुस्ती या खेळासंबंधी तंत्रज्ञान आदान-प्रदान करण्याबाबत जपानमधील वाकायामा स्टेट व महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या शासकीय निवासस्थान सेवासदन येथे आज जपानच्या वाकायामा स्टेटच्या शिष्टमंडळासोबत प्राथमिक चर्चा करण्यात आली. यावेळी जपानच्या वाकायामा स्टेटचे इंटरनॅशनल अफेअर्स डिव्हिजनचे उपसंचालक यामाशिता हे त्यांच्या सहकाऱ्यांसह उपस्थित होते. राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाचे विविध उपक्रम, मिळविण्यात आलेल्या पदाकांविषयी मंत्री महाजन यांनी वाकायामा स्टेट यांना माहिती दिली. (Sports News)

तसेच कुस्ती या खेळासंबंधी तंत्रज्ञान आदान-प्रदान करण्याबरोबरच खेळाडूंना प्रशिक्षण देण्याविषयी सकारात्मक चर्चा करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. सामंजस्य करार लवकरात लवकर होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत मंत्री महाजन यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जरांगे एकटेच मुंबईला येणार, परवानगी नाकारल्यानं जरांगेंचा गनिमीकावा?

दिशा सालियन प्रकरणात गुन्हा दाखल; मुख्य आरोपींमध्ये आदित्य ठाकरेंचं नाव

Car Insurance : कार इन्शुरन्स क्लेम होऊ शकतो रद्द; चुकूनही करू नका या १० चुका

उद्धव ठाकरे पुढच्या वर्षी मुख्यमंत्री होणार! बड्या नेत्याच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: कोल्हापुरात गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात

SCROLL FOR NEXT