Mumbai Traffic Diverted Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Traffic Update : दसरा मेळाव्यानिमित्त मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल; या भागातील रस्ते आज राहणार बंद

Mumbai Traffic Diverted : मुंबईत आज शिवसेना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार असल्याने वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.

Satish Daud

Mumbai Traffic Update : मुंबईत आज शिवसेनेच्या दोन्ही गटाचे (ठाकरे आणि शिंदे) दसरा मेळावे होणार आहे. ठाकरे गटाचा दसरा मेळावा दादरमधील शिवाजी पार्क तर शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर घेतला जाणार आहे. यापार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सज्ज झाले असून शहरात तब्बल १५ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय वाहतुकीत देखील अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. काही रस्ते दिवसभर बंद राहणार आहेत.

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पूर्व द्रुतगती महामार्ग आणि ऐरोळी मार्गावरून ठाण्याकडे जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. वाहनचालकांना पर्यायी मार्गाची व्यवस्था करुन देण्यात आली आहे. त्यानुसार, पूर्व द्रुतगती मार्गावर उत्तर वाहिनीने ठाण्याकडे जाणारी सर्व अवजड वाहने ऐरोली जंक्शन येथून नवी मुंबई मार्गाकडे वळवण्यात आली आहे.

आज १२ ऑक्टोबर दुपारी १२ वाजल्यापासून १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत अशीच वाहतूक व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. दुसरीकडे दादर परिसरात वाहने उभी करण्यास मज्जाव करण्यात प्रतिबंध घालण्यात आले आहेत. याशिवाय स्वातंत्रवीर सावरकर मार्ग, महापालिका मार्ग, महात्मा गांधी मार्ग, हजारी महल सोमानी मार्ग या भागात वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

राजा बढे चौक जंक्शन ते केळुस्कर मार्ग उत्तर जंक्शनपर्यंत वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. भागातून जाणाऱ्या वाहनांना एल. जे. रोड, गोखले रोड - रिटलमॅन जंक्शनवरून पढे गोखले रोड हा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. दिलीप गुप्ते मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग जंक्शन येथून दक्षिण वाहिनीकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी असल्याने वाहनचालकांनी राजा बढे जंक्शन येथून एल. जे. रोडचा वापर करावा, असं सांगण्यात आलं आहे.

गडकरी चौक येथून केळुस्कर रोड दक्षिण व उत्तर पर्यंत वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे. या भागातील वाहतूक एम. बी. राऊत मार्गावरुन वळवण्यात आली आहे. दरम्यान, वासुदेव बळवंत फडके चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्याची वाहतूक एल. टी. मार्ग चकाला जंक्शन - उजवे वळण - डी. एन. रोडने सी.एस.एम.टी. अशी वळविण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Winter Foods: हिवाळ्यात भारतातील या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत आहात का? 'हे' पदार्थ नक्की खाऊन बघा..

SCROLL FOR NEXT