Pune Big Traffic Changes Today  Saam TV
मुंबई/पुणे

Maratha Reservation: मराठा आरक्षण पदयात्रा आज पुण्यात धडकणार; पोलिसांनी वाहतुकीचे मार्गच बदलले

Pune Big Traffic Changes: आज मराठा पदयात्रेचा चौथा दिवस असून पदयात्रा पुणे शहरात धडकणार आहे. त्यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

Satish Daud

Pune Big Traffic Changes Today

मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठा आंदोलकांनी मुंबईच्या दिशेने कूच करण्यास सुरुवात केली आहे. आज मराठा पदयात्रेचा चौथा दिवस असून पदयात्रा पुणे शहरात धडकणार आहे. त्यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेता पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी वाहनचालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहे. वाहनचालकांनी या मार्गांचा वापर करावा, असे आवाहन देखील वाहतूक पोलिसांच्या वतीने करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) आज नगर रस्त्यावरील रांजणगाव, कोरेगाव भीमामार्गे खराडी-वाघोली परिसरात मुक्कामी येणार आहे. त्यामुळे नगर रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत.

नगर रस्त्यावरील वाहतूक मंगळवारी पहाटे ३ वाजेनंतर हळू हळू वळविण्यात आली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून नगरकडे जाणारी वाहने कात्रज, खडी मशिन चौक, मंतरवाडी फाटा, हडपसरमार्गे सोलापूर रस्ता, केडगाव चौफुलामार्गे, न्हावरे, शिरुरमार्गे नगर रस्त्याकडे वळवण्यात आली आहे.

त्याचबरोबर वाघोली, लोणीकंदमार्गे नगरकडे जाणारी वाहतूक ही थेऊर फाटामार्गे सोलापूर रस्त्याकडे वळविण्यात आली आहे. तर ही वाहतूक तेथून केडगाव चौफुला, न्हावरे, शिरुरमार्गे नगरकडे वळविण्यात आली आहे. पुणे शहरातून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी मगरपट्टा चौक, सोलापूर रस्ता, यवत, केडगाव चौफुला, न्हावरे, शिरुरमार्गे नगरकडे जावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT