Pune Metro saam tv
मुंबई/पुणे

Pune Metro: पुण्याची मेट्रो सुसाट! चांदणी चौकापर्यंत पोहचणार; १३ स्थानकांसाठी ३६२४ कोटी रुपये मंजूर

Big Boost for Pune Metro: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे मेट्रोचा लवकरच विस्तार होणार आहे. पुणे मेट्रो २ साठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यासाठी तब्बल ३६२४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले.

Priya More

पुणे मेट्रोच्या रामवाडी ते वाघोली आणि वनाज ते चांदणी चौक या उन्नत मार्गिकांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. या निर्णयामुळे पुणे शहरातील मेट्रोचे जाळे आणखी विस्तारणार असून वाहतूक कोंडीत गुदमरलेल्या पुणेकरांचा प्रवास सुखाचा होणार आहे.

नव्या मार्गीकेमुळे शहरातील नागरिकांना पूर्व पश्चिम भाग, पिंपरी चिंचवड, हिंजवडी आयटी हबदरम्यान प्रवास करणे अधिक सोयीचे होणार आहे. नवी मेट्रो थेट वाघोली च्या पुढे विठ्ठलवाडी पर्यंत जोडण्यात येणार आहे त्यामुळे नगरमार्गावर होणारा वाहतूक कोंडीचा त्रास देखील कमी होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक झाली. या बैठकीमध्ये पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-२ वनाझ ते चांदणी चौक (कॉरिडॉर २अ) आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडीला (कॉरिडॉर २ब) पहिल्या टप्प्याअंतर्गत विद्यमान वनाझ-रामवाडी कॉरिडॉरचा विस्तार म्हणून मंजुरी दिली. हे दोन उन्नत कॉरिडॉर १२.७५ किमी लांबीचे असतील आणि त्यात १३ स्थानके असतील. जी चांदणी चौक, बावधन, कोथरूड, खराडी आणि वाघोली यासारख्या जलद-विकसनशील उपनगरांना जोडतील. हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अंदाजे खर्च ३६२६.२४ कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. हा खर्च केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि बाह्य द्विपक्षीय/ बहुपक्षीय एजन्सींनी समान प्रमाणात वाटून घेणार आहे. पुणे मेट्रोच्या या नव्या टप्प्यामुळे पुण्यातील पूर्व-पश्चिम सार्वजनिक वाहतूक मजबूत करण्यासाठी चांदणी चौक ते वाघोली मेट्रो कॉरिडॉर तयार केला जाणार आहे. या विस्तारांमुळे पौड रोड आणि नगर रोड सारख्या प्रमुख मार्गांवर गर्दी कमी होण्यास मदत होईल. पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा तयार झाल्यानंतर याचा मोठा फायदा प्रवाशांना होणार आहे आणि वाहतूक कोंडी देखील कमी होणार आहे. विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना आपल्या इच्छीत स्थळी पोहचवण्यास या मेट्रोमुळे फायदा होणार आहे.

कशी असणार नवी मार्गिका?

दोन्ही मार्गांची एकूण लांबी: १२.७५ किलोमीटर

वनाज ते चांदणी चौक लांबी: १.२ किलोमिटर

रामवाडी ते वाघोली/ विठ्ठलवाडी लांबी: ११.६३ किलोमिटर

प्रकल्पाचा अपेक्षित एकूण खर्च: ३६२४ कोटी

पूर्ण होण्यासाठी अंदाजे कालावधी: ४ वर्ष

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Elections: मुंबई महानगरपालिका निवडणूक; वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Maharashtra Politics: मोठी बातमी, अखेर काका-पुतणे एकत्र! दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती, अजितदादांची घोषणा

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का; भाच्याने केला अजित पवार गटात प्रवेश

Monday Horoscope : भगवान महादेवाची कृपा होणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात भाग्यकारक घटना घडणार

Bangladesh Violence: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळलं |VIDEO

SCROLL FOR NEXT