Sanjay Raut vs Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut : संजय राऊतांना सर्वात मोठा धक्का; CM शिंदेंनी जामीनदारच फोडला!

संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय भाऊसाहेब चौधरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रामगिरी या निवासस्थानी येऊन बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात बसून संजय राऊतांना सगळ्यात मोठा धक्का दिला आहे. राऊतांच्या जामीनावर स्वाक्षरी करणाऱ्या जामीनदारालाच शिंदेंनी त्यांच्या पक्षात घेतलं आहे.  संजय राऊत (Sanjay Raut) यांचे अत्यंत निकटवर्तीय भाऊसाहेब चौधरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रामगिरी या निवासस्थानी येऊन बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच भाऊसाहेब चौधरी यांनी संजय राऊत यांचा जामीनदार म्हणून कोर्टात स्वाक्षरी केली होती. (Maharashtra Political News)

भाऊसाहेब चौधरी यांना शिवसेनेचा उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख नेता म्हणून बघितलं जात होतं. तसंच ते संजय राऊत यांचं अत्यंत निकटवर्तीय सुद्धा होते. संजय राऊत यांच्या कोर्ट कामकाजातील क्रमांक एकची व्यक्ती म्हणून भाऊसाहेब चौधरी यांच्याकडे बघितलं जातं. मात्र, चौधरी यांनीच आता शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.

महाविकास आघाडीच्या गेल्या अडीच वर्षांच्या कालखंडात नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची अपेक्षित असलेली कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. मात्र राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यावर मात्र गेल्या पाच महिन्यात अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले गेले या निर्णयामुळे प्रभावित झाल्यामुळेच आपण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार झालो असल्याचे मत भाऊसाहेब चौधरी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

भाऊसाहेब चौधरी यांचे यावेळी पक्षात स्वागत करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना त्याच्या भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून गेली कित्येक वर्ष शिवसेनेत कार्यरत असलेल्या भाऊसाहेब चौधरी यांचा प्रवास सर्वसामान्य विभागप्रमुख पदापासून ते डोंबिवली शहरप्रमुख आणि त्यानंतर नाशिक संपर्कप्रमुख अशी पदे भूषवली आहेत. त्यांच्या कामाची पद्धत मला माहित असून त्यांच्याकडून यापूढे देखील उत्तम काम घडेल अशी अपेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.  (Latest Marathi News)

यावेळी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार सुहास कांदे, ठाणे जिल्हाप्रमुख आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे,कल्याण ग्रामीण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे हे देखील उपस्थित होते.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाड-येवला मार्गावरील अंकाई शिवारात टँकरची रिक्षाला धडक, 6 जण जखमी

Yerwada jail : धक्कादायक! येरवडा कारागृहात हाणामारी; कंबर आणि डोक्यात फरशी घातली, आरोपीचा मृत्यू

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा निवडणूक प्रचारात; मतदारांना ‘या’ पक्षाला मतदानाचं आवाहन|VIDEO

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

SCROLL FOR NEXT