Bike taxi ban Maharashtra 
मुंबई/पुणे

मोठी बातमी! Ola, Uber आणि Rapido ला मोठा दणका! अनधिकृत बाईक टॅक्सींवर बंदी; सरकारची कठोर भूमिका

Bike taxi ban Maharashtra : महाराष्ट्र सरकारने अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. एफआयआर दाखल करण्याची मागणी परिवहन विभागाने केली आहे.

Namdeo Kumbhar

Ola Uber Rapido news, illegal bike taxi services : राज्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांविरोधात परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी सेवा देणारी ॲप्स तातडीने बंद करून संबंधित कंपनी मालकांवर एफआयआर (FIR) दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सायबर क्राईम विभागाकडे पत्राद्वारे केली आहे. त्याचबरोबर परिवहन आयुक्तांनी देखील या संदर्भात सायबर क्राईम विभागाला पत्र पाठवले आहे.

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून विविध ॲप्सच्या माध्यमातून कोणतीही वैध परवानगी, शासन मान्यता किंवा परिवहन विभागाच्या नियमांचे पालन न करता प्रवासी वाहतूक सुरू आहे. रॅपिडोसारख्या संस्थांच्या अनधिकृत बाईक टॅक्सींचे प्रमाण वाढत असून, ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असल्याचे मंत्री सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे.

या अनधिकृत सेवांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेची कोणतीही हमी नाही. त्याशिवाय चालकांची पडताळणी, विमा संरक्षण, महिला सुरक्षेविषयक उपाययोजना तसेच आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अत्यंत अपुरी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता पत्रात नमूद करण्यात आली आहे. याशिवाय, शासनाच्या परिवहन नियमांचे खुलेआम उल्लंघन करून या ॲप्समार्फत आर्थिक व्यवहार सुरू असल्याने परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांच्या व्यवसायावर अन्यायकारक परिणाम होत असल्याचे परिवहन विभागाने म्हटले आहे.

सायबर क्राईम विभागाकडे करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप्सचे ऑनलाइन संचालन तातडीने बंद करणे, संबंधित ॲप कंपन्या, चालक आणि व्यवस्थापनावर माहिती तंत्रज्ञान कायदा व मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करणे, तसेच कंपनी मालकांवर गुन्हे दाखल करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अकोल्याला उष्ण लाटेचा इशारा, तापमान ४५ पार

Gold-Silver Price Hike: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता सोनं-चांदी खरेदी करणं आणखी महागणार

Fruit in Summer: उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी फळं कोणती? वाढत्या उकाड्यात नक्की करा आहारात समावेश

Tea Recipe: चहामध्ये साखरेऐवजी 'हा' एक पदार्थ टाका; चवीसोबतच आरोग्यालाही मिळतील 5 जबरदस्त फायदे

Dombivli : इरशाळवाडीत ट्रेक करताना अचानक काय घडलं? डोंबिवलीच्या २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT