NCP Maval Taluka Saam TV
मुंबई/पुणे

Breaking News: अजित पवारांच्या कट्टर समर्थकाचा तडकाफडकी राजीनामा; राष्ट्रवादीत मोठी खळबळ

Maval Taluka News: ऐन लोकसभेची निवडणूक तोंडावर असताना अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मुर्‍हे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

दिलीप कांबळे

Ajit Pawar NCP Latest News

ऐन लोकसभेची निवडणूक तोंडावर असताना अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मुर्‍हे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मुऱ्हे हे अजित पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांची मावळ तालुक्यात मोठी ताकद आहे.

मुर्‍हे यांनी अचानक राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीत मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, संतोष मुर्‍हे यांच्यासह मावळ तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पदांचा राजीनामा पक्षाकडे सुपूर्त केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मावळमध्ये अजित पवार गटाला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांना पक्षीय पातळीवर दुय्यम स्थान दिले जात असल्याने नाराजीतून हा राजीनामा देण्यात आला असल्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

दुसरीकडे, अजित पवारांनी (Ajit Pawar) दिलेल्या आदेशानंतर मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या पुढाकाराने मावळ तालुक्यात नाराज असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची नाराजी दूर करण्यात यश आले आहे. पदाधिकाऱ्यांचा पदाचा राजीनामा हा वरिष्ठ पातळीवर नामंजूर करण्यात आला आहे.

परंतु गैरसमजातून काही घटना घडल्याने मावळ मधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अजित पवार गटाचा राजीनामा दिला होता. परंतु येणाऱ्या काळात कोणत्याचा दुजाभाव कोणत्याही कार्यकर्ता अथवा पदाधिकारी यांच्याबाबत मावळ तालुक्यात होणार नाही, असं खांडगे यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

त्याचबरोबर सर्व नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची नाराजी दूर झाली असून ते सर्व जण आता मावळ तालुक्यात अजित पवार गटाचेच काम करणार असल्याचे स्पष्टीकरण मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिले आहे.

तब्बल 25 वर्षांची भाजपाची सत्ता बाजूला करून मावळ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद तयार केली. मात्र, अजित पवार स्वतंत्र झाल्यानंतर मावळ मधील एक गट अजित पवार यांच्याबरोबर तर उर्वरित गट हा शरद पवार यांच्याबरोबर गेला.

त्यामुळेच अजित पवार गटाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र मागील काही दिवसांपासून मावळ मध्ये सुरू असलेले राजीनामा नाट्य सुरू असल्याने शरद पवार गटाच्या आशा पल्लवित झाल्या आहे.

मात्र, अजित पवारांनी लक्ष देत तालुकाध्यक्ष यांना नाराजी दूर करण्यासाठी सांगितले. यात मावळचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यशस्वी झाले. त्यामुळे अजित पवार गटाची ताकद ही कायम राहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT