Mumbai Police Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Police: मोठी बातमी! २ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन, मुंबई पोलिस दलात खळबळ

Mumbai Police Payroll Scam: मुंबई पोलिस दलामध्ये मोठा वेतन घोटाळा समोर आला आहे. बनावट पोलिस आयडी तयार करून तब्बल साडेसाह कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले.

Priya More
  • मुंबई पोलिस दलात मोठा वेतन घोटाळा

  • ६.५ कोटी रुपयांवर मारला डल्ला

  • बनावट पोलिस आयडी तयार करून पैसे ट्रान्सफर केले

  • २ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन

गणेश कवडे, मुंबई

मुंबई पोलिस दलातून मोठा वेतन घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. दोन पोलिसांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. या घोटाळ्यामुळे मुंबई पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांचा पगार काढणाऱ्या मंत्रालयीन लिपीक आणि पोलिस अधिकाऱ्यांनीच सरकारच्या तब्बल साडेसहा कोटी रुपयांवर डल्ला मारला. या प्रकरणी समतानगर पोलिस ठाण्यातील ५ अधिकारी आणि कर्माचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

२ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन -

बनावट पोलिस सर्विस आयडी आणि डीसीपीएस आयडी तयार करून पोलिस कर्मचारी दाखवून त्या आधारावर पगार मंजूर करण्यात आला होता. हे काम करणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे पोलिस दलातून निलंबन करण्यात आले आहे. विजया चव्हाण त्याचबरोबर वरिष्ठ लिपिक अमोल मेश्राम यांचे निलंबन करण्यात आले आहे.

कुणी केले पैसे ट्रान्सफर -

पोलिस कर्मचाऱ्यांच्या पगाराचा डेटा सेवार्थ प्रणालीतून नव्या प्रणालीमध्ये ट्रान्सफर करत असताना हो मोठा घोटाळा उघड झाला आहे. उत्तर प्रादेशिक विभागामध्ये पोलिसांचे पगार काढण्याचे काम केले जाते. याठिकाणच्या मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनी ज्या व्यक्ती पोलिस दलामध्ये नाहीत अशा व्यक्तींना पोलिस कर्मचारी दाखवले आणि त्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले. ८ ते १० बोगस व्यक्तींच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केल्याचे उघड झाला. या व्यक्तींच्या खात्यावर नियमित पगार ट्रान्सरफर केला जात होता.

२०१९-२०२० मधील आहे प्रकरण -

हे प्रकरण ऑडीट केल्यानंतर उघडकीस आले. रक्कमेमध्ये तफावत आढळून आल्यानंतर सरकारकडून २०१९ आणि २०२० या दोन वर्षांचे ऑडिट करण्यात आले. यामधून रक्कमेमध्ये मोठी तफावत आढळून आली. हे तपासत असताना ज्या व्यक्तींच्या नावावर पगार जात होता त्यांची नावं तपासल्यानंतर ते मुंबई पोलिस दलात पोलिस नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: बाप्पा मोरया! गणेशोत्सव 'या' राशींसाठी घेऊन येणार भरभराट; अचानक धनलाभाची शक्यता

... अन्यथा कोर्टात जाणार; मराठा क्रांती मोर्चाचा 15 दिवसांचा अल्टिमेटम, कारण काय?

Maharashtra News Live Update: लक्ष्मण हाकेंना दिलेली Y प्लस सुरक्षा तात्काळ काढा; मराठा क्रांती मोर्चाचा 15 दिवसांचा अल्टिमेटम

अमित शहा मुंबई दौऱ्यावर असतानाच केजरीवालांनी खेळला मोठा गेम; नव्या युतीनं वाढवली भाजपसह काँग्रेसची डोकेदुखी

Soak Badam Benefits: सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम खा; शरीराला मिळतील ‘हे’ ७ आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT