WOMAN POLICE OFFICER HARASSED IN BHIWANDI saam tv
मुंबई/पुणे

महिला पोलीस कर्मचाऱ्याचा पाठलाग करून विनयभंग; निलंबित पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

Bhiwandi Suspended Police Constable Harassment Case: भिवंडीत महिला पोलीस कर्मचाऱ्याचा वारंवार पाठलाग करून अश्लील शिवीगाळ आणि विनयभंग केल्याचा आरोप. विशाखा समितीच्या अहवालानंतर निलंबित पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Omkar Sonawane

फैय्याज शेख, साम टीव्ही

महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा वारंवार पाठलाग करून अश्लील शब्दात शिवीगाळ करत विनयभंग केल्याप्रकरणी एका निलंबित पोलिस कर्मचाऱ्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे भिवंडी पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पोलिस कर्मचारी पोलिस ठाण्यात कार्यरत असताना एप्रिल 2023 ते 9 जून 2026 या कालावधीत आरोपीने वारंवार त्यांचा पाठलाग केला. पोलिस ठाण्याच्या परिसरात येऊन त्यांच्याशी वाद घालणे, अश्लील शब्द वापरणे आणि शिवीगाळ करण्याचे प्रकार करण्यात आले. तसेच महिला कर्मचारी घरी जात असताना एसटी स्टँड परिसरातही त्यांचा पाठलाग करून त्रास देण्याचाअ प्रयत्न करण्यात आला.

या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याने विशाखा समितीकडे तक्रार दाखल केली होती. समितीच्या अहवालानंतर पोलिस उपायुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित निलंबित पोलिस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या महिनाभरात भिवंडी शहरात दोन पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल झाल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

14 लाखांच्या धातूची घरफोडी करणाऱ्या पाच आरोपींना अटक; नारपोली पोलिसांची कारवाई

भिवंडी तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत रोडवरील सद्गुरू कंपाउंड परिसरात होली मेरी स्कूलजवळ असलेल्या गोदाम क्रमांक 745/1 मध्ये ही घरफोडी झाली होती. 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबरदरम्यान अज्ञात चोरट्यांनी गोदामाच्या लोखंडी जाळीचे आणि शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर लीड मेटल, बिस्मथ मेटल, सोल्डर मेटल आणि डीव्हीआर असा एकूण 14 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी 12 नोव्हेंबर रोजी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन नारपोली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अवघ्या दोन दिवसांत पोलिसांनी पाच संशयित आरोपींचा ठावठिकाणा शोधून त्यांना अटक केली. यामध्ये शौकत उर्फ वसीम अकबरअली खान, अब्दुल हासिम वदुत खान, गयासुद्दीन सलाहुद्दीन चौधरी, सलमान शाबान अली खान आणि अंबिया सजाउद्दीन मिर्झा यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Family Pension Rules : सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दरमहा ₹9,000 मिळणार? सरकारने स्पष्ट केले पेन्शनचे नियम

Maharashtra News Live Update: सांगली दिंडीत ट्रक घुसून महिला वारकऱ्याचा मृत्यू तर चार वारकरी जखमी

Police Commissioner: पोलीस आयुक्त्याचं व्हॉट्सॲप हॅक; स्टेटसवर 50 मिनिटे चालले अश्लील व्हिडिओ!

Eknath Shinde: उद्धव यांची शहांवर टीका; शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले, ठाकरे थापाडे!

Donald Trump-PM Modi : मोदी 'टफ मॅन'; ट्रम्प यांच्याकडून कौतुक, QUAD नेत्यांच्या बैठकीतून केली सर्वात मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT