bhiwandi police crime  saam tv
मुंबई/पुणे

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Bhiwandi Police Head Constable Rajendra Pawar Caught Taking ₹30,000 Bribe: भिवंडीत भंगार व्यावसायिकाकडून 35 हजारांची लाच मागून 30 हजारांत तडजोड करणाऱ्या पोलिस हवालदाराला एसीबीने रंगेहाथ पकडले. कारिवली पोलिस चौकीत ही कारवाई करण्यात आली.

Omkar Sonawane

फैय्याज शेख, साम टीव्ही

राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेला मागच्या काही दिवसांपासून भ्रष्टाचाराची कीड लागल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. मोठमोठे अधिकारी, मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक तसेच पोलिस कर्मचारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. कुठलेही शासकीय काम करून घेण्यासाठी टेबलाखालून मोठी रक्कम त्यांच्या घशात घालावी लागत असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून केल्या जातात. अशातच भिवंडीमध्ये एका पोलिस शिपायाला लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं आहे. या कारवाईमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.

भिवंडी येथील भंगार व्यवसायिकास त्याचा व्यवसाय कोणताही त्रास न येऊ देता सुरळीत सुरू ठेवण्यासाठी 30 हजाराची लाच घेताना भोईवाडा पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाईला कारिवली येथील पोलिस चौकीमध्ये मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याची घटना घडली आहे. राजेंद्र कृष्णा पवार (वय 46) असे अटक केलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून त्यांना हा व्यवसाय चालू ठेवायचा असल्यास आणि त्यामध्ये कोणताही त्रास होणार नाही याकरीता भोईवाडा पोलिस ठाण्यातील हवालदार राजेंद्र पवार याने भंगार व्यवसायाकडे 35 हजार रुपयांची मागणी केली होती. व्यवसायाकाची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी 19 ऑगस्ट रोजी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली.

या दरम्यान राजेंद्र पवार यांनी तडजोडीअंती 30 हजर रुपये घेण्याची संमती दर्शविली. त्यानंतर दुपारी 3.40 वाजताच्या सुमारास कारिवली येथील पोलिस चौकीत 30 हजार रुपये स्वीकारताना मुंबई येथील पथकातील पोलिस निरीक्षक मनोज गोडसे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हवालदार राजेंद्र पवार याला रंगेहाथ पकडून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT