Bhiwandi Fire Saam Tv
मुंबई/पुणे

Fire Broke In Bhiwandi: भिवंडीत पुन्हा अग्नितांडव; गोदामाला भीषण आग, कोट्यवधींच नुकसान

Shivani Tichkule

Bhiwandi Fire: भिवंडी येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. भिवंडीत एका गोदामाला भीषण आग लागली आहे. शनिवारी सायंकाळी पाऊस पडत असतानाच वळ ग्रामपंचायत हद्दीतील ग्लोब कॉम्प्लेक्स या गोदामला आग लागली.

या आगीमुळे एसी, फ्रिज, टीव्ही, वॉशिंगमशीन, मायक्रो ओव्हन असे इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले आहे. ही घटना काल (२४ जून) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली आहे. मात्र ही आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. (Latest Marathi News)

ही आग (Fire) इतकी भीषण होती की चार गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. आगीमुळे गोदामामध्ये साठविलेली कोट्यवधी रुपये किमतीचे साहित्य जळून खाक झाले आहे. आगीची माहिती मिळताच भिवंडी (Bhiwandi) अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होत त्यांनी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.

परंतु पाण्याचा तुटवडा भासत असल्याने व त्यातच एसी फ्रिज यांचे कॉम्प्रेसर फुटत असल्याने आग पुन्हा पुन्हा भडकत होती. त्यामुळे कल्याण (Kalyan) व ठाणे (Thane) येथील अग्निशामक दलाला सुध्दा पाचारण करण्यात आले आहे. सुदैवाने आगीच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतू या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी आणखी सहा ते सात तास लागणार असल्याची माहिती अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT