Thane Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Bhiwandi Crime News: दुर्गंधीमुळे शेजारी वैतागले, दार उघडताच पायाखालची जमीनच सरकली!

Thane News: दुर्गंधीमुळे शेजारी वैतागले, दार उघडताच पायाखालची जमीनच सरकली!

साम टिव्ही ब्युरो

Thane kongaon Murdered News:

भिवंडीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील कोनगावात एका 36 वर्षीय महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या महिलेची हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे. ही महिला एका तरुणसोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये होती. त्यानेच तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मधू प्रजापती असं मयत महिलेचे नाव आहे. राजपुत इमारतीच्या एका बंद खोलीतून दुर्गंधी येत असल्याने इमारतीच्या मालकाने पोलिसांना कळवले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर दुर्गंधी येत असलेल्या घराचा दरवाजा तोडताच स्वयंपाकघरात एका महिलेचा मृतदेह कुजलेला अवस्थेत पोलिसांना सापडला.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात अशी माहिती समोर आली की, मधू प्रजापती ही घटस्फोटीत असून ती तिच्या पार्टनरसोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होती. या दोघांनी लिकडेच कोनगाव येथे भाड्याने घर घेतलं होतं आणि गेल्या 11 महिन्यांपासून ते कोनगाव येथे राहत होते. दर महिन्याला ते राजपुत इमारतीत एक-दोन आठवडे राहायला येत होते. दोघेही जवळच एका कारखान्यात काम करत होते.  (Latest Marathi News)

शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, हत्या झालेल्या महिलेची एक मैत्रिणही काही दिवसांपासून या दोघांसोबत राहात होती. आरोपीने तिच्या मित्राला फोन करून आपण काहीतरी वाईट कृत्य केल्याचे सांगितले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा धारदार शत्राने गळा चिरण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतू अधिक तपासासाठी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनसाठी जे जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, आरोप फरार आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून आरोपीचा शोध घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT