BHIWANDI BUILDING COLLAPSE: 9 DEAD AFTER KOHINOOR APARTMENT CRASHES, RESCUE OPERATION UNDERWAY Saam Tv
मुंबई/पुणे

Bhiwandi : भिवंडीत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ४ मजली इमारत कोसळली, ९ जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

Bhiwandi Building Collapsed Update News : भिवंडीतील नारपोली येथील कोहिनूर अपार्टमेंट ही चार मजली इमारत कोसळून ९ जणांचा मृत्यू झाला. एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि पोलिसांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे.

Alisha Khedekar

  • भिवंडीतील नारपोली परिसरातील कोहिनूर अपार्टमेंट ही चार मजली इमारत गुरुवारी रात्री कोसळली

  • या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला.

  • तळमजल्यावरील पिलरच्या दुरुस्तीचे काम सुरू होते

  • ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती

फैय्याज शेख, भिवंडी

ठाण्यातील भिवंडी परिसरात दुर्दैवी घटना घडली. भिवंडी महानगरपालिका हद्दीतील नारपोली परिसरातील गंगारामवाडी येथील कोहिनूर अपार्टमेंट ही चार मजली इमारत गुरुवारी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास अचानक पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या दुर्घटनेत या दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली असून, आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी बचाव आणि शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान मृतांची नावे देखील समोर आली असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी महानगरपालिका हद्दीतील नारपोली परिसरातील गंगारामवाडी येथील कोहिनूर अपार्टमेंट ही चार मजली इमारत 2007 मध्ये बांधण्यात आली. या इमारतीत दोन विंग असून एकूण ३० घरे आहेत. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे ही इमारत सुरुवातीपासूनच कमकुवत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे भिवंडी महानगरपालिकेने तिला अतिधोकादायक घोषित केले होते. गुरुवारी तळमजल्यावरील काही पिलर नादुरुस्त झाल्याने त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. सायंकाळी सहा वाजल्यापासून इमारतीला तडे जाऊ लागले आणि रात्री आठच्या सुमारास ती एका बाजूला झुकू लागल्याचे दिसून आले.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभाग समिती क्रमांक ४ चे सहाय्यक आयुक्त अरविंद घोगरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत इमारत रिकामी करण्याची कारवाई केली. मात्र, त्यानंतरही तळमजल्यावरील दुरुस्ती सुरूच होती. तसेच काही रहिवासी घरातील साहित्य घेण्यासाठी पुन्हा इमारतीत गेल्याने इमारत अचानक कोसळली आणि ते ढिगाऱ्याखाली अडकले.

जेसीबीसह विविध यंत्रणांच्या मदतीने मलबा हटविण्याचे काम सुरू असून अग्निशमन दल, एनडीआरएफ, पोलीस आणि पालिका प्रशासन संयुक्तपणे बचावकार्य करत आहेत. मृतांमध्ये शमीम शेख (३२), रंजीत सिंग (४५), मिराज रसूल शेख (३४), संतोष कुमार पांडे (४२) आणि शमीम अन्सारी (३०) यांचा समावेश असून, दोन मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. प्रशासनाकडून बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Poha Side Effects : रोज पोहे खाताय? मग सावधान! ब्लड शुगरसह 'या' ३ गंभीर समस्यांचा वाढतो धोका

Maharashtra News Live Update: ST महामंडळाच्या ऑडिटवरून भाजप शिंदेसेना संघर्ष पेटणार

Ladki Bahin Yojana : ₹१५०० की ₹३०००, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात या महिन्यात किती पैसे येणार? पाहा अपडेट

Rava Khobryache Modak Recipe : ना उकड, ना जास्त मेहनत! फक्त २ पदार्थांत बनवा गणरायाचे आवडते रवा-खोबऱ्याचे मोदक

Vidyanand Bapat: श्रद्धेचा अवमान नको! विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस; ४८ तासांत बिनशर्त माफीची मागणी

SCROLL FOR NEXT