Bhimashankar Bus Fire Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : भिमाशंकरला जाणाऱ्या भाविकांच्या बसला आग; आगीत बस जळुन खाक

या आगीने काहीच वेळात रौद्र रूप धारण केले.

रोहिदास गाडगे

पुणे - नाशिकमध्ये बसला आग लागल्याची घटना ताजी असताना भिमाशंकर (Bhimashankar) येथे देखील प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. श्री क्षेत्र भिमाशंकरला भाविकांच्या बसला अचानक आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. भिमाशंकर रोडवर शिंदे वाडी येथे ही घटना घडली आहे. कल्याण वरुन २९ प्रवाशी घेऊन जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसला अचानक आग लागली.

या आगीने काहीच वेळात रौद्र रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि घोडेगाव पोलीसांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. मात्र बस आगीत जळुन खाक झाली आहे. बसला जेव्हा आग लागली तेव्हा बसमध्ये २९ प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. (Tajya News)

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महामार्गावर बसला आग लागण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये (Nashik) प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी बस ट्रॅव्हल आणि आयशर ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की बसने (Bus Accident) पेट घेतला होता. यामध्ये अनेक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : या राशींच्या व्यक्तींना नागदेवता पावणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय

Kolhapur Superstition : अंधश्रद्धेचा कहर! बाहुली, नारळ, लिंबू अन् एक चिठ्ठी; कोल्हापुरात घटस्फोटासाठी अघोरी प्रकार

Ashok Sharaf: सलमान खानने अशोक सराफ यांचा गळाच कापला; ३३ वर्षानंतर मामांनी सांगितला शुटिंगचा थरारक किस्सा

Micro Walking: मायक्रो वाकिंग म्हणजे काय? यामुळे कोणते फायदे होतात

SCROLL FOR NEXT