Bhayandar Crime News Saamtv
मुंबई/पुणे

Bhayandar Crime: एका टॅटूमुळे लागला छडा! शिर नसलेल्या महिलेच्या हत्येचे गूढ उकलले; पती आणि भावाला अटक

Uttan Sagari Police Crime: अवघ्या बारा तासात या हत्येचा पोलिसांनी तपास केला असून महिलेच्या पतीनेच ही भयंकर हत्या केल्याचे समोर आले आहे.

चेतन इंगळे

Bhayandar Crime News: भाईंदरच्या पातानच्या समुद्र किनाऱ्यावर एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. एका प्रवासी बॅगमध्ये हा शिर नसलेला मृतदेह टाकण्यात आला होता. इतक्या निर्घृणपणे कोणी हत्या केली असावी? याचा शोध लावण्याचे मोठे आव्हान सागरी पोलिसांसमोर होते.

मात्र अवघ्या बारा तासात या हत्येचा पोलिसांनी तपास केला असून महिलेच्या पतीनेच ही भयंकर हत्या केल्याचे समोर आले आहे. (Bhayandar Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तन सागरी पोलिसांना सकाळी (2 जून) भाईंदर पश्चिम येथील उत्तन पाटण समुद्रकिनाऱ्यावर एका ट्रॅव्हल बॅगमध्ये महिलेचा मृतदेह आढळला होता. शिर नसलेला मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे या हत्येचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.

मात्र या तपासात एक टॅटू महत्वाचा ठरला आहे. मृत महिलेच्या हातावर त्रिशूल, डमरू आणि ओमचे गोंदण होते. टॅटूच्या मदतीने नवघर पोलिस स्टेशनच्या क्राईम युनिटने हत्या करणाऱ्यांचा शोध लावला असून तरुणीच्या पतीला आणि त्याच्या भावाला अटक केली आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजली सिंग असे या मृत तरुणीचे नाव असून चारित्र्याच्या संशयावरुन तिच्या पतीने आणि भावानेच ही हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपीने 24 मे रोजी पत्नी अंजलीचा चारित्र्यावर संशय घेऊन खून केला. तसेच तिचा मृतदेह भावाच्या मदतीने समुद्रात फेकून दिला होता. नवरा मिट्टू सिंग व त्याचा भाऊ चुनचून सिंग अशी आरोपींची नावे आहेत. (Latest Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

SCROLL FOR NEXT