Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेत शनी महाराज?ज्योतिषतज्ज्ञ काय म्हणाले? वाचा!

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी १७ आमदारांसह बंड केल्याची माहिती मिळत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: सध्या राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी १७ आमदारांसह बंड पुकारले आहे, त्यामुळे ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. यावर आता ज्योतिषतज्ज्ञांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्रिकेत शनी महाराजाने प्रवेश केला असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या भविष्यावर महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी जून हा महिना अंत्यत प्रतिकूल दाखवत आहे. उद्धव ठाकरे यांची रास सिंह आहे, या कन्या लग्नाच्या पत्रिकेत २६ जूनला येणारा मंगळ आठव्या स्थानावरून प्रस्थान करणार असल्यामुळे त्यांच्यासाठी हा महिना अत्यंत प्रतिकूल दाखवत आहे. गुरुचे बळ हे या राशिला पॉवरफुल नाही, शनी जरी वक्री झाला तरी, त्या व्यक्तीचे बाकीचे गृह किती स्ट्राँग असेल तर काही होत नाही. त्यांना आता मोठ्या सपोर्टची गरज आहे. राजकीयदृष्ट्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे गुण जुळत आहेत, त्यामुळे ते सत्तेत येऊ शकतात, असं राजकीय ज्योतिषतज्ज्ञ सिद्धेश मारटकर म्हणाले.

स्वामी रवी यांच्यावर शनीची दृष्टी आहे. यामुळे अधिकाराच्या संदर्भात दि. २४ जानेवारी २०२० पासूनच प्रतिकूलता सुरू झाली. दि. २९ एप्रिल २०२२ ला शनी कुंभ राशीत आला आहे. या सातव्या स्थानातील शनीची मंगळ, प्रथमस्थानातील चंद्रावर दृष्टी आली आहे. त्यामुळे दि. २९ एप्रिल २०२२ अधिक पासून प्रतिकूलता अधिक गडद झाली.

यामुळे शिवसेनेत बंड झाले आहे. त्यामुळे हे बंड भाजपच्या पथ्यावर पडू शकते असं बोलल जात आहे. भाजपने (BJP) विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का दिल्यानंतर आता शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) १७ आमदारांसह नॉट रीचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार अडचणीत आल्याचे बोलले जात आहे.

एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही आमदारांना घेऊन गुजरातमधील सूरत येथील एका हॉटेलमध्ये थांबले असल्याची माहिती आहे. दरम्यान, ते भाजपमध्ये BJP) प्रवेश करणार अशा चर्चांना उधान आलं असतानाच, आता एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या (Shivsena) काही आमदारांसह संध्याकाळपर्यंत राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

एकीकडे महाविकास आघाडी सरकार वाचवण्यावरून शिवसेना चहुबाजूंनी घेरली गेली असतानाच ही नवी माहिती समोर आली आहे. अशातच मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील 30 हून अधिक आमदारांनी राजीनामा दिला तर, महाराष्ट्रात खरोखरच राजकीय भूकंप होऊ शकतो. कारण, एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देणं म्हणजे शिवसेनेवरची नाराजी आणखी तीव्रपणे व्यक्त करणं. याचाच अर्थ शिवसेनेनं केलेली शिष्टाई परिणामकारक ठरली नाही आणि कुठल्याही क्षणी महाविकास आघाडी सरकार धोक्यात येऊ शकतं, असं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT