Best Mumbai News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News: बोनस जाहीर करुनही बेस्ट कर्मचारी संपावर ठाम

काल सांताक्रूझ डेपोतील बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निवृत्ती बाबर -

मुंबई : काल सांताक्रूझ डेपोतील (Santa Cruz Depot) बेस्टचे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारला होता त्याच पद्धतीने मुंबईतील जोगेश्वरी येथील मजास डेपो (Majas Depot), धारावी डेपो, प्रतीक्षा नगर डेपोतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज अचानक संप पुकारला आहे.

बोनस, पगारवाढ, तसेच बेस्टच्या कर्मचाऱ्यांना (BEST Employees) ज्या सुविधा मिळतात त्या आम्हाला का मिळत नाहीत अशा अनेक मागण्यासाठी बेस्टचे कंत्राटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. आज सकाळपासून जोगेश्वरी येथील मजास बस आगारातील ३०० कंत्राटी कर्मचारी अचानक संपावर गेले असून या संपाचा परिणाम आता हळूहळू पश्चिम उपनगरात पाहायला मिळतं आहे.

काल देखील असाच संप सांताक्रुझ डेपोटील 700 कामगारांनी पुकारला होता. मात्र प्रशासनाने त्यांना 7500 हजार रुपये बोनस जाहीर केल्यामुळे त्या कामगारांनी संप मागे घेतला होता. मात्र, आता मजस आगारातील 300 कामगार आज सकाळपासूनच संपावर गेलेत. समान काम, समान वेतन पगार वाढ आणि बोनस या मागण्या घेऊन बेस्ट कर्मचारी अचानक संपावर गेल्यामुळे ऐन दिवाळीत मुंबईकर आणि चाकरमान्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Blockage: हार्ट ब्लॉकेजची सुरुवातीची लक्षणे काय? जाणून घ्या याचं मूळ कारण अन् शरीरावर होणारा परिणाम

Weight Loss: दररोज सकाळी 'हे' काम केल्याने वजन होईल लवकर कमी, आठवडाभर करुन पाहा हे उपाय

Maharashtra Live News Update : अकोला महापालिकेत महायुती होणार?

Mumbai-pune : मुंबईहून पुणे फक्त ९० मिनिटात अन् बंगळुरू ५ तासात, नव्या एक्सप्रेसची A टू Z माहिती

Accident : ट्रकने दुचाकीला उडवले, बायकोच्या डोळ्यासमोर नवऱ्याचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT