Best Bus yandex
मुंबई/पुणे

BEST bus fare hike: मुंबईकरांच्या खिशाला कात्री, बेस्ट बसच्या तिकीट दरात वाढ होणार? भाडे किती रुपयांनी वाढणार?

BEST bus ticket price 2025: मुंबईत काळ्या पिवळ्या टॅक्सी आणि ऑटोचे भाडेवाढ झाल्यानंतर बेस्ट बसेसच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता आहे. तिकीट दर दुप्पट करण्याचा विचार केला जात आहे.

Bhagyashree Kamble

मुंबईकरांना पुन्हा एकदा महागाईचा चटका बसण्याची शक्यता आहे. देशाची आर्थिक राजधानी अर्थात मुंबईत, काळ्या पिवळ्या टॅक्सी आणि ऑटोचे भाडेवाढ झाल्यानंतर बेस्ट बसेसच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाला होत असलेला तोटा आणि कर्मचाऱ्यांची देणी या पार्श्वभूमीवर तिकीट दर दुप्पट करण्याचा विचार केला जात आहे. मुंबईच्या रस्त्यांवर दररोज एसी आणि नॉन एसी बस धावतात. सध्या नॉन एसी बसचे किमान भाडे ५ रूपयांवरून १० रूपये आणि एसी बसचे तिकीट ६ वरून १२ रूपये करण्यात येणार आहे.

बेस्टने तिकिट दरवाढीचा विचार केला असता. गेल्या वर्षभरापासून त्याला मुहूर्त मिळालेला नाही. सध्या बेस्टने एक प्रस्ताव तयार केला आहे. ज्यात बसचे भाडे ५ वरून १० आणि एसी बसचे भाडे ६ वरून १२ रूपये करण्याचे ठरवले आहे. बेस्टला सध्या दिवसाला सुमारे २ कोटी रूपये उत्पन्न मिळत आहे. भाडेवाढीमुळे वाढ होईल, अशी आशा एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे सीईओ आणि बेस्ट बसचे प्रभारी व्यवस्थापक एस.व्ही. आर श्रीनिवास यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'कर्मचाऱ्यांची देणी आणि तोटा यावर तोडगा काढण्यासाठी भाडेवाढीशिवाय पर्याय नाही. यावर लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल. बेस्ट बस सध्या दररोज २ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळवत आहे. भाडेवाढीनंतर आणखी उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय घेऊ', असं श्रीनिवास म्हणाले.

१ फेब्रुवारीपासून ऑटो - टॅक्सीच्या भाडेवाढीमध्ये वाढ

१ फेब्रुवारीपासून महाराष्ट्र सरकारच्या परिवहन विभागाने काळ्या आणि पिवळ्या टॅक्सी आणि ऑटोच्या भाड्यात वाढ केली आहे. ऑटो आणि काळ्या पिवळ्या टॅक्सींचे किमान भाडे प्रत्येकी ३ रूपयांनी वाढवण्यात आले आहे. तर, ऑटो रिक्षाचे किमान भाडे २३ रूपयांवरून २६ रूपये करण्यात आले आहे. तर, आता बेस्ट बसेसच्या तिकीट दर दुप्पट करण्याचा विचार उपक्रमाकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT