Ravi Rana vs Uddhav Thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

Rajya Sabha: ...त्यांचा विनाश होणार; मतदानाला जाता-जाता राणांनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं

' १०१ वेळा हनुमान चालीसा वाचून आलोय, हनुमान चालीसा मातोश्रीसमोर म्हंटली तर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण शिंदे -

मुंबई : आज मी १०१ वेळा हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) वाचून आलोय, हनुमान चालीसा मातोश्रीसमोर म्हंटली तर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. आता विधानभवनात जातोय गुन्हा दाखल होतोय का ते पाहतो, ज्यांनी हनुमान चालीसाचा अपमान केला त्यांचा विनाश होणार असं वक्तव्य अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केलं आहे.

राज्यसभेच्या ६ जागांसाठी आज मतदान पार पडलं आहे. यावेळी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या आमदार रवी राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray) निशाणा साधला.

हे देखील पाहा -

राणा म्हणाले, ' मी मतदानाला येताना १०१ वेळेस हनुमान चालीसा पठण करून आलो आहे. ज्यांनी हनुमान चालीसाचा अपमान केला त्यांचा विनाश होणार, उद्धवजींनी औरंगाबादमध्ये (Aurangabad) सांगितलं काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालीसा पठण करायला पाहिजे, तुम्ही एकदा मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण केली तर मी काश्मीरला जाऊन वाचेन असंही राणा यावेळी म्हणाले.

तसंच भाजपाचे सगळे उमेदवार निवडून येतील असा विश्वास देखील यावेळी व्यक्त केला. दरम्यान, आज दिवसभरात विधानभवन, मुंबई येथे राज्यसभेच्या (RajyaSabha) ६ जागांसाठी दुपारी ३.३० वाजेपर्यंत २८५ आमदारांनी मतदान केलं असून सध्यांकाळी निकाल लागल्यानंतर कोणते उमेदवार विजयी होतील हे स्पष्ट होईल.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sabudana Pej: अवघ्या १० मिनिटांत साबुदाणा पेज कशी बनवायची?

Maharashtra Live News Update : सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी विधान परिषदेमध्ये चर्चा

Crime: नवरा-बायकोचं भांडण, निष्पाप बाळाचा गेला जीव; चुलतीने मारण्यासाठी त्रिशूळ उगारला अन्...

New born Baby Care: नवजात बाळासाठी कॉटनचे कपडेच का असतात सर्वोत्तम पर्याय?

ITR Filling 2025: बायकोला रोख रक्कम देताय, कापला जाईल टॅक्स, आयकर नियम काय सांगतात? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT