Beed Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Beed Crime : बाप नव्हे हा तर हैवान! पोटच्या मुलीसोबत केलं धक्कादायक कृत्य; बीडमधील संतापजनक घटना

बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना बीडमधून उघडकीस आली आहे.

विनोद जिरे

Beed Crime News : बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना बीडमधून उघडकीस आली आहे. एका दारुड्या पित्याने पोटच्या 10 वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तर यावेळी आजी-आजोबांमुळे चिमुकली नराधम पित्याच्या तावडीतून वाचल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी आजीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नराधम बापास बेड्या ठोकल्या आहेत. (Latest Marathi News)

७० वर्षीय वृद्ध महिलेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा दारूच्या आहारी गेलेला आहे. त्याच्या सततच्या त्रासामुळे पत्नी ६ महिन्यांपूर्वी माहेरी निघून गेली आहे. आरोपीला दोन मुली आहेत. त्यांचा सांभाळ आजी-आजोबा करतात.

गेल्या ७ डिसेंबरला "तू तुझ्या आईला फोन का केलास", असे म्हणत १० वर्षीय पीडित मुलीला पित्याने मारहाण (Crime News) केली. त्यानंतर ८ डिसेंबरच्या पहाटे पित्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी वेळीच आजी-आजोबांनी नातीला आरोपी बापाच्या तावडीतून सोडले अन तिला घेऊन रिक्षाने नातेवाईकाचे घर गाठले.

दरम्यान, याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत. बापानेच आपल्या पोटच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : राज्यसभेत अमित शहांना बोलवा - मल्लिकार्जुन खर्गे

Shiv Sena Live Update : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? कोर्टातून आली महत्त्वाची अपडेट

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंविरोधात संजय राऊतांच्या हॉटेलमध्ये बैठका; खासदाराच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

Auto Taxi Marathi Rule : मराठी आलं नाही तर लायसन होणार रद्द! आज येणार शासनाचा मोठा निर्णय; परिवहन मंत्र्यांची माहिती

Society Rule : सोसायटीत जिम अन् स्विमिंग पूलचे वेगळे पैसे घेतले जातायत? मग ही बातमी नक्की वाचा, तुमचे हक्क काय सांगतात

SCROLL FOR NEXT