Crime News
Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News : स्टेटस ठेवताना काळजी घ्या! पुण्यात ९ तरुणांवर गुन्हा दाखल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव

Pune Crime Latest News : इम्प्रेशन मारण्यासाठी अनेक जण सोशल मीडियावर आपले चित्रविचित्रफोटो आणि स्टेटस पोस्ट करत असतात. पण, असे स्टेटस ठेवताना जपून राहण्याची गरज आहे. कारण, सोशल मीडियावर हातात कोयते घेऊन स्टेटस ठेवणे ९ तरुणांना चांगला महागात पडलं आहे.

पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेच्या युनिट सहाने कारवाई करत ९ तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. लोणी काळभोर, हडपसर लागत असणाऱ्या या नऊ तरुणांवर हत्यार बंदी कायद्या अंतर्गत पुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही सगळी तरुण मंडळी काही दिवसांपासून फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर हातात हत्यार म्हणजेच कोयता घेऊन त्याचा व्हिडिओ काढून प्रसारित करत होते. मात्र तो फोटो चांगलाच व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या हाती लागला.

यानंतर पुणे (Pune) पोलिसांच्या गुन्हे शाखेने याची दखल घेत ९ तरुणांवर गुन्हा दाखल केला. तेजस बधे, उदय कांबळे,बाबू सोनवणे, रोहित जाधव, संग्राम थोरात, श्याम जाधव तसेच आणखी तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आधीच पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने अक्षरशः धुमाकूळ घालून पोलिसांच्या नाकी नऊ आणले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागात कोयता गँग सक्रिय आहे. अजूनही पुण्यात सर्रास दहशत माजवण्याचा प्रकार काही थांबायचं नाव घेत नाहीये. त्यातच लोक सोशल मीडियावर हातात कोयते घेऊन स्टेटस ठेवत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Shekhar Suman joins BJP: अभिनेते शेखर सुमन यांनी केला भाजपा पक्षात प्रवेश

Baramati Lok Sabha: बारामतीकरांना ४ जूनला गोड बातमी मिळेल; आमदार रोहित पवारांना विश्वास

सातारा लाेकसभा मतदारसंघात पैसे वाटप झाल्याचा पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, Video

Baramati News | EVM वर कमळाचं चिन्हच नाही, बारामतीचे आजोबा संतापले

Live Breaking News : Raigad Breaking : बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा मतदानावर बहिष्कार

SCROLL FOR NEXT