Baramati Firing News: Two Rounds Fired At Businessman Rajan Kolekar's Car saam tv
मुंबई/पुणे

बारामतीत गोळीबाराचा थरार! आलिशान कारमधून आलेल्या उद्योजकावर धडाधड गोळ्या झाडल्या

Baramati Businessman Firing : बारामतीच्या शिवशंभोनगर परिसरात उद्योजक राजन कोळेकर यांच्या घराजवळ उभ्या असलेल्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी दोन राऊंड फायर केले. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नसून बारामती तालुका पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Bharat Jadhav

  • बारामतीच्या शिवशंभोनगर परिसरात गोळीबाराची घटना घडली.

  • उद्योजक राजन कोळेकर यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला.

  • हल्लेखोरांनी दोन राऊंड फायर केल्याची माहिती आहे.

बारामती एमआयडीसी परिसरात गोळीबाराची घटना घडलीय. आज सायंकाळी सहाच्या सुमारास बारामतीमधील उद्योजकाच्या गाडीवर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांनी दोन राऊंड फायर केलेत. सुदैवानं यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. बारामतीच्या शिवशंभोनगर मधील उद्योजक राजन कोळेकर यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी घराजवळ येत दोन राउंड फायर केले.

याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जातोय. शिवशंभो नगर परिसरात राहणारे उद्योजक राजन कोळेकर यांच्या घराच्या परिसरात येऊन अज्ञात व्यक्तींनी दोन राउंड फायर केले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नसून मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांकडून पुढील तपास सुरू केलाय.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बारामती एमआयडीसी भागातील शिवशंभो नगर येथे उद्योजक राजन कोळेकर यांचे निवासस्थान आहे. आज या परिसरात काही अज्ञात हल्लेखोर आले आणि त्यांनी कोळेकर यांच्या गाडीला लक्ष्य करत दोन गोळ्या झाडल्या. गोळीबाराच्या आवाजामुळे परिसरात काही काळ घबराट आणि खळबळ उडाली. गोळीबाराची घटना घडली तेव्हा नेमके कोण गाडीत होते किंवा कोळेकर घटनास्थळी उपस्थित होते का, तसेच या हल्ल्यामागे नेमका काय हेतू होता, याबाबत अद्यापमाहिती समोर आलेली नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा पेण मतदार संघावर दावा

कुठे घोड्यांची शर्यत, कुठे विदेशी मासे; पुण्यातील पेटोपियात नेमकं काय सुरू आहे? VIDEO

प्रसिद्ध मॉडेल बलात्कार प्रकरणात मुंबईतील उद्योजकाला दिलासा; न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

Sleep Health : पूर्ण झोप घेऊनही सकाळी थकवा जाणवतोय? ही आहेत 6 धक्कादायक कारणे!

मराठा आरक्षणाच्या लढ्यात नवा ट्विस्ट! विखे पाटलांसह मनोज जरांगेंनाही घेरलं; थेट राजीनामा...

SCROLL FOR NEXT