Cm Eknath Shinde in Namo Rojgar Melava Saam Tv
मुंबई/पुणे

Baramati News: 'बारामती शहर विकासाचे रोल मॉडेल', अजित पवार यांचं नावं घेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले...

Namo Rojgar Melava In Baramati: नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला स्वतःचे आणि राज्याचे भविष्य घडविण्याची एक मोठी संधी मिळाली आहे. असे सांगतानाच बारामती येथे आयोजित या मेळाव्यातून २५ हजार युवांना रोजगार मिळेल, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

साम टिव्ही ब्युरो

Namo Rojgar Melava In Baramati:

नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला स्वतःचे आणि राज्याचे भविष्य घडविण्याची एक मोठी संधी मिळाली आहे. असे सांगतानाच बारामती येथे आयोजित या मेळाव्यातून २५ हजार युवांना रोजगार मिळेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. बारामती शहर हे एक विकासाचे प्रारूप (मॉडेल) आहे, असेही यावेळी ते म्हणाले.

विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने आयोजित पुणे विभागस्तरीय 'नमो महारोजगार मेळाव्या'च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मेळाव्यात तरुणाईला मार्गदर्शन मिळेल आणि रोजगारही उपलब्ध होईल. यापूर्वी नागपूर, लातूर, अहमदनगर येथे मेळावे झाले असून बारामती येथे आयोजित हा मेळावा सर्व विक्रम मोडणारा असून यातून २५ हजार युवांना रोजगार मिळेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.  (Latest Marathi News)

बारामती शहर विकासाचे मॉडेल

बारामती शहर हे एक विकासाचे प्रारूप (मॉडेल) आहे. शहराच्या विकासात शरद पवार, अजित पवार यांचे मोठे योगदान आहे. विकासकामे करताना सर्व कामे वेळेत आणि दर्जेदार व्हावीत हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कटाक्ष असतो. आज उद्घाटन झालेल्या प्रकल्पांच्या दर्जात कुठेही तडजोड झाली नाही, हे दिसून येते, असं ते म्हाणाले.

१ लाख ६० हजार रोजगार दिले

राज्यात यापूर्वी नोकरभरती बंद होती. या शासनाने ७५ हजार रोजगार देण्याचे लक्ष्य ठेवले होते. त्या तुलनेत १ लाख ६० हजार रोजगार दिले आहेत. विविध नोकर भरती सुरू असून २२ हजार पोलिसांची भरती, ३० हजारावर शिक्षकांची पदे भरण्यात येत आहेत. त्यात मराठा समाजाला आरक्षण दिलेलेही समाविष्ट आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

'शासन आपल्या दारी' मध्ये २ कोटी ६० लोकांना लाभ

शासन आपल्या दारी हा देखील राज्य शासनाचा लोकाभिमुख उपक्रम असून विविध योजना, शासन निर्णय असताना तसेच लाभार्थी असतानाही शासकीय कार्यालयात जाण्याची कटकट नको म्हणून लाभ सोडून देणाऱ्या नागरिकांना लाभ देण्यासाठी उपक्रम राबविण्यात आला. यात एकच छताखाली गरिबांना घरांचा, महिला बचत गट, शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ड्रोन, हार्वेस्टर आदी अनेक लाभ दिले. या कार्यक्रमातून २ कोटी ६० लाख लोकांना विविध लाभ देण्यात आले.

प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमात राज्याचे पूर्ण योगदान

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तरुणाईला थेट नियुक्तीपत्रे देण्याचा कार्यक्रमांतर्गत जवळपास १० लाख युवकांना नोकऱ्या देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. राज्य शासनही यात कुठेही कमी पडणार नाही. प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत १ कोटी ४० लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. नवीन शिक्षण धोरणामधील अभ्यासक्रमातही कौशल्य विकास अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेतून रोजगार देणारे हात निर्माण करण्याचाही शासनाचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. गेल्या दोन वर्षात दाओस येथे जवळपास ५ लाख कोटींचे सामंजस्य करार झाले असून यातून ४ ते ५ लाख रोजगार निर्माण होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Skin Tips: पिंपल्स आणि ओपन पोर्सपासून सुटका हवी? मग न विसरता या ७ गोष्टी प्रत्येक मुलीने नक्की फॉलो करा

निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रावरून राष्ट्रवादीत विसंवाद? तटकरे आणि गर्जे यांच्यात शा‍ब्दिक चकमक, VIDEO

Bank Holiday: बँका शनिवारी सुरु असणार की बंद? वाचा RBIची सुट्ट्यांची यादी

Pune : पुण्यातील धक्कादायक घटना, आधी पोटच्या मुलीचा गळा दाबला, नंतर ६ वर्षांच्या मुलाला घेऊन विहिरीत उडी मारली

Maharashtra Live News Update : यवतमाळमध्ये अवकाळी पावसाचा फटका; १७८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT