baramati assembly by election : Saam tv
मुंबई/पुणे

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या विरोधात काँग्रेस उमेदवार देणार? बड्या नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

baramati assembly by election : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत ट्विस्ट निर्माण झालाय. या पोटनिवडणुकीवर विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलं.

Vishal Gangurde

बारामती पोटनिवडणुकीत राजकीय ट्विस्ट

सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता

काँग्रेस उमेदवार देण्याची शक्यता आहे

दिवगंत अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभेसाठी पोटनिवडणुकीत जाहीर करण्यात आली आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांनाच उमेदवारी दिली जाणार आहे. तर शरद पवार गट या जागेवर उमेदवार देणार नाही. त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा होती. या जागेवरून लक्ष्मण हाके यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली आहे. त्यानंतर काँग्रेसच्या बड्या नेत्याने बारामतीत उमेदवारी देण्याविषयी मोठं भाष्य केलं आहे. त्यामुळे बारामतीत तिहेरी लढत होणार का, हे पाहावे लागेल.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाच्या भूमिकेने ट्विस्ट निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य मान्य नसल्याचे म्हटलं आहे.

'बारामती पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नसले, तर काँग्रेस उमेदवारीबाबत विचार करेल, असं भाष्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं. सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यानंतर वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. बारामती आणि राहुरीमध्ये दोन विधानसभा मतदारसंघात येत्या २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर ४ मे रोजी निकाल जाहीर होईल.

विजय वडेट्टीवारांनी नेमकं काय भाष्य केलं?

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की, 'शरद पवार गटाची भूमिका मान्य नसून तिकडे राष्ट्रवादी लढणार नाही. त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढायचा विचार करू. पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक याआधी देखील झाली आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे'.

'राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या विलिनीकरणाचा विषय होता, त्यावेळी त्यांनी काँग्रेसशी चर्चा केली नव्हती. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सुनेत्रा पवारांच्या विरोधात उमेदवार कसा देणार, त्यांची भूमिका महाविकास आघाडी म्हणून मान्य नाही. त्या जागेवर राष्ट्रवादी लढणार नसेल, तर काँग्रेसला उमेदवार देण्याबाबत विचार करावा लागेल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळ घोषणेवर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया; चंद्रपूरमधील सुटलेल्या तालुक्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Silk Saree Designs: फॅन्सी आणि कम्फर्टेबल महिलांसाठी सिल्क साड्यांचे युनिक कलेक्शन, 5 लेटेस्ट डिझाईन्स

Political Row : भाजप मंत्री ऑन कॅमेरा भडकला! थेट तरुणाच्या कानशिलात हाणली; Video प्रचंड व्हायरल

Tilache Tel: रात्री झोपण्यापूर्वी तिळाच्या तेलाचे २ थेंब नाभीत सोडा, १५ दिवसांत दिसेत रिझल्ट

दोन शहरात भीषण गोळीबार; 27 जणांचा मृत्यू, 15 गंभीर जखमी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT