BAR​​AMATI ATTACK: RANA DILIP SURYAWANSHI INJURED saam tv
मुंबई/पुणे

बारामतीत कोयत्याचा धुमाकूळ, प्रसिद्ध उद्योगपतीला बोलवलं अन् केले वार; पुणे जिल्ह्यात खळबळ

Baramati Crime News : बारामतीत रामा शिपिंग कॉर्पोरेशनचे मालक राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. फोटो काढण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्यावर वार केल्याची माहिती आहे.

Namdeo Kumbhar

मंगेश कचरे, बारामती प्रतिनिधी

Baramati Attack, Rana Dilip Suryawanshi : बारामतीमधील विमानतळ परिसरात ‘रामा शिपिंग कॉर्पोरेशन’चे मालक तथा प्रसिद्ध उद्योगपती राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्कुटीवरून आलेल्या तोंडाला मास्क बांधलेल्या दोघा अज्ञातांनी "आम्ही तुमचे फॅन आहोत, आम्हाला तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे," असे सांगत राणा सूर्यवंशी यांच्याशी संवाद साधला आणि फुलांचा बुके देत अचानक त्यांच्यावर कोयत्याने वार केला. या भीषण हल्ल्यामध्ये राणा सूर्यवंशी यांच्या खांद्यावर कोयत्याचा गंभीर वार झाला असून, त्यांना ५ ते ६ इंच खोल जखम झाली आहे.

कशी घडली घटना?

राणा सूर्यवंशी हे आपल्या वैयक्तिक कामानिमित्त गोजुबाबी गावाच्या हद्दीत रेल्वे ब्रिजच्या बाजूला आले होते. विशेष म्हणजे, या वेळी त्यांच्यासोबत शासनाकडून मिळालेली सुरक्षा (सिक्युरिटी) नव्हती. नेमकी याच गोष्टीचा फायदा घेत हल्लेखोरांनी त्यांच्यावर निर्दयीपणे वार केला. या घटनेनंतर बारामती तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा (LCB) तसेच फॉरेन्सिक टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी सर्व बाजूने तपास सुरू केला आहे.

गोळीबाराच्या चर्चेवर पोलिसांचे स्पष्टीकरण:

हल्ल्यादरम्यान मोठा आवाज झाल्यामुळे परिसरात गोळीबार झाल्याचीही चर्चा रंगली होती. मात्र, यावर बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी स्पष्ट केले की, घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे गोळीबाराबाबत कोणतेही पुरावे किंवा काततुसे आढळलेली नाहीत. प्रत्यक्षदर्शींनी केवळ मोठा आवाज झाल्याचे सांगितले असून, गोळीबार झाल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

पुण्याला हलवले; प्रकृती स्थिर

हल्यानंतर राणा सूर्यवंशी यांना तातडीने बारामतीमधील एका खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी दिली आहे. रुग्णालयाबाहेर आणि परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची पथके कामाला लागली आहेत. उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वीही राणा सूर्यवंशी यांच्यावर अशा प्रकारचा हल्ला झाला असल्याची माहिती समोर आली असून पोलीस या जुन्या प्रकरणाच्या अनुषंगानेही तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT