Baramati Nimbut Firing News:  Saamtv
मुंबई/पुणे

VIDEO: 'सुंदर'च्या व्यवहाराचा वाद, निंबुत येथील गोळीबारात रणजित निंबाळकर यांचा मृत्यू; बैलगाडा शर्यत क्षेत्रात खळबळ

Baramati Nimbut Firing News: या प्रकरणी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे आणि त्यांचा मुलगा गौरव काकडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर गौतम काकडे हे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Gangappa Pujari

मंगेश कचरे, बारामती, ता. २९ जून २०२४

बारामती तालुक्यातील निंबुत येथे बैल खरेदीच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या गोळीबारामध्ये जखमी झालेले रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे आणि त्यांचा मुलगा गौरव काकडे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी (ता. २९ जून) बारामती तालुक्यातील निंबुत येथे बैलगाडा शर्यतीच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली. निंबुत येथील बैलगाडा शर्यत शौकिन गौतम काकडे यांच्या घरासमोर हा गोळीबार झाला होता. या गोळीबारामध्ये फलटण येथील रणजित निंबाळकर हे गंभीर जखमी झाले होते.

आज उपचारादरम्यान निंबाळकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे आणि त्यांचा मुलगा गौरव काकडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर गौतम काकडे हे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेने बैलगाडा शर्यत क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून हा गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे. गौतम काकडे यांनी फलटण येथील रणजीत निंबाळकर यांचा शर्यतीचा बैल खरेदी केला होता. हा खरेदी केलेला बैल निंबाळकर हे पुन्हा मागत होते. तसेच ठरलेलं पैसे न दिल्याच्या कारणावरून हा वाद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT