India Today
मुंबई/पुणे

Bandra Terminus: वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर रेल्वे प्रशासनाला जाग; प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीबाबत घेतला मोठा निर्णय

Bandra Terminus Stampede: वांद्रे टर्मिनलवर आज सकाळी चेंगराचेंगरी झाली. त्यात ९ जण जखमी झालेत. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकीटविषयी मोठा निर्णय घेतलाय.

Bharat Jadhav

वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली असून प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलाय. सणासुदीची गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध घालण्यात आले आहेत. आज सकाळी वांद्रे रेल्वे स्टेशनवरही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.स्थानकावरील फ्लॅटफॉर्मवर क्रमांक १ वर ट्रेनमध्ये चढताना चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेमध्ये ९ जण जखमी झाले होते. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतलाय.

रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, प्लॅटफॉर्मवरील गर्दीचे व्यवस्थापन करणे. स्टेशन परिसरात प्रवाशांच्या सुरळीत हालचालीसाठी हा निर्णय घेण्यात आलाय. तिकीट विक्रीचे निर्बंध ८ नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पुणे आणि नागपूर, स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती प्रतिबंधित करण्यात आलीय. ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरजा असलेल्या प्रवाशांना मात्र निर्बंधांमधून सूट देण्यात आलीय.

आज पहाटे ५ वाजताच्या सुमारास वांद्रे- गोरखपूर या ट्रेनमध्ये चढताना वांद्रे स्टेशनवर चेंगराचेंगरीचा प्रकार घडला. या चेंगराचेंगरीमध्ये अनेकणजण जखमी झालेत. रेल्वेत चढण्यासाठी प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रेल्वेत चढत असतानाच झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. वांद्रे येथील भाभा रूग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींमधील ७ प्रवाशांची प्रकृती स्थिर असून दोघेघण गंभीर असल्याच सांगितलं जात आहे.

या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना गर्दी न करण्याचं आणि रेल्वेत चढत असताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. दरम्यान, या वांद्रे ते गोरखपूर या रेल्वेने प्रवास करण्यासाठी गर्दी केलेले बहुतांश प्रवाशी हे छट पुजेसाठी उत्तर प्रदेशात आपल्या गावी जात होते, अशी प्राथमिक माहिती सांगितली जात आहे.

गेल्या काही महिन्यांत रेल्वेच्या झालेल्या अपघातांची चौकशी रेल्वे विभागाने केली पाहिजे. केंद्रीय रेल्वे मंत्री हे रेल्वे प्रवाशांच्या समस्यांकडे आणि प्रवाशांना होणाऱ्या त्रासाकडे कायम दुर्लक्ष करत आहेत. केंद्र सरकार सध्या सर्व खासगीकरण करतंय. रेल्वे विभागातील अधिकारी हे प्रवाशांबरोबर व्यवस्थित वागत देखील नाहीत. उर्मट भाषा बोलतात पण त्यांना अभय कोणाचं आहे? रेल्वे प्रशासनाकडे गाड्यांची सख्या वाढण्याची मागणी केली तरी ते देत नाहीत”, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी रेल्वे प्रशासनावर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SUV 2026: फीचर्स फुल्ल, स्टाइल कमाल! मार्केटमध्ये धुमाकूळ घालायला सज्ज 5 दमदार मिड–साईज SUV; खासियत ऐकून थक्क व्हाल

Shocking: लग्नात फोटोसेशन सुरू असताना स्टेज कोसळला, नवरा-नवरी, भाजप नेत्यासह १० जण पडले; पाहा VIDEO

Solapur News: सूचना एक कानानं ऐकली दुसऱ्या कानाने सोडली; आगार प्रमुख 'ऑन द स्पॉट सस्पेंड'

Maharashtra Politics: 2 डिसेंबरपूर्वीच राजकीय भूकंपाचा ट्रेलर! शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदेंच्या स्टेजवर|VIDEO

Maharashtra Live News Update:यवतमाळ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल

SCROLL FOR NEXT