विकास मिरगणे, नवी मुंबई
रिकामी वेळेत अनेकदा अधूनमधून तोंडी लावण्यासाठी अनेक पदार्थ आपण खात असतो. पाकीट बंद पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात. हे पदार्थ कुठे बनतात? हे पदार्थ बनवताना किती काळजी घेतली जाते? हे बऱ्याचदा नागरिकांना माहित नसतं. उत्पादन बनवण्याची घाणेरडी जागा, उत्पदनाचे खराब साहित्य यामुळे कित्येकवेळा ग्राहकांच्या उत्पदनाविषयक तक्रारी येतात. अशीच एक घटना नवी मुंबई शिळफाटा परिसरात केळी वेफर्स बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये उघडकीस आली आहे. मराठी कामगार सेनेच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली असता या करखान्यांचा पर्दाफाश झाला आहे.
नवी मुंबईतील शिळफाटा परिसरात केळी वेफर्स बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये मराठी कामगार सेनेच्या अधिकाऱ्यांनी निरीक्षण केले असता त्यांच्या पाहणीत धक्कादायक बाब उघडकीस आली. मराठी कामगार सेनेच्या निरीक्षणानुसार, शिळफाटा (नवी मुंबई) परिसरातील केळी वेफर्स तयार करणाऱ्या कारखान्यांमध्ये अत्यंत घाणेरड्या आणि आरोग्यास अपायकारक पद्धतीने उत्पादन होत असल्याचे समोर आले. मराठी कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य चिटणीस दत्ता भाऊ पुजारी यांनी त्यांच्या निरीक्षणात उघड केले की, या ठिकाणी सडलेली व निकृष्ट दर्जाची केळी वापरली जात होती. तसेच खराब व पुनर्वापर केलेले तेल वापरून वेफर्स तळले जात होते. ही उत्पादन जागा अतिशय गलिच्छ व आरोग्यदृष्ट्या धोकादायक अवस्थेत होती.
येथील कामगार कोणतीही आरोग्यविषयक साधने वापरत नव्हते. असे असूनही स्थानिक प्रशासन व अन्नभेसळ विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे नवी मुंबई परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला असून, अन्न भेसळ विरोधी विभाग, उत्पादन शुल्क विभाग, आणि अन्न व औषध प्रशासनाने (FDA) याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.
नवी मुंबई तसेच ठाणे व रायगड परिसरात ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या अन्नपदार्थांची निर्मिती होते, त्या सर्व कारखान्यांची तपासणी करून निकृष्ट दर्जाच्या व घाणेरड्या पद्धतीने उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी मराठी कामगार सेनेने केली आहे. दरम्यान बाहेर विकले जाणारे हे पदार्थ चवीला जरी चटक देणारी असले तरी ते आरोग्याला हानिकारक असतात. त्यामुळे आपण खात असलेले पदार्थ सुरक्षित आहेत का याची खात्री करून घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.