आज पासून राज्यातील नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरू होत आहेत. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर यामध्ये कलाकारांचा उत्साह पाहायला मिळतोय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले मिमिक्री आर्टिस्ट योगेश सुपेकर अभिनेत्री जयमाला इनामदार अभिनेत्री वनमाला बागुल अभिनेत्री पूजा पवार ऋतुजा मराठे अनेक कलाकार मोठ्या संख्येने बालगंधर्व रंगमंदिर मध्ये आले आहेत.
यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले,दिग्दर्शक लेखक नागराज मंजुळे तसेच अनेक चित्रपट, नाट्य सृष्टीतील कलाकार यांच्या प्रमुख उपस्थितीत नटराज पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला कलाकार, तंत्रज्ञ आणि रंगभूमीवरील पडद्यामागील कलाकार उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
हे देखील पहा -
यावेळी अजित पवार म्हणले की, खरंतर अस प्रसंग आपल्यावर यायला नको होता. पण निसर्गाच्या पुढे आपण काहीही करू शकत नाही. 19 महिने सातत्याने सर्व बंद होतं. कधी सुरु करणार असा प्रश्न सातत्याने विचारण्यात यायचा. मात्र, आपल्याकडून चुका होऊ नये आणि तिसरी लाट येऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी लागली. लवकरच बालगंधर्व नाट्यमंदिराचं नूतनीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली.
पुढे ते म्हणले की, सध्या आमच्याकडे 56 हजार कलाकारांची यादी आहे. त्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून 5 हजार रुपये देण्याचा प्रयत्न केला. इथून पुढे कलावंतांना त्रास होणार नाही याची काळजी देखील घेण्यात येणार. सध्या परिस्थिती आवाक्यात आहे. कालच देशात शंभर कोटी लसीकरणाचा टप्पा पार करण्यात आला मुळशी तालुक्याने १००% लसीकरण केलेलं आहे.
तसेच यावेळी अजित पवारांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना इशारा दिला आहे. ते म्हणले की, मुंबईतील बॉलिवूड बाहेर जाऊ देणार नाही सर्व सहकार्य करू सरकार मदत करेल मात्र बॉलिवूड मुंबईतच राहिल.
खूप दिवस कलावंतांनी खूप काही सहन केलं आहे. मात्र, आता कलाकारांच्या मंडळांबाबत आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ. दिवाळीनंतर 100 टक्के क्षमतेनं नाट्यगृह सुरु करण्याचा विचार करु, असे आश्वासन देखील त्यांनी अजित पावर यांनी दिले.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.