Badlapur Minor Girl Molestation In School Bus Saam Tv
मुंबई/पुणे

Badlapur : बदलापुरात पुन्हा धक्कादायक प्रकार, शाळेच्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Badlapur Minor Girl Molestation In School Bus : बदलापूर येथे स्कूल बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीशी चालकाने विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • बदलापूरमध्ये स्कूल बसमध्ये विद्यार्थिनीशी विनयभंगाचा प्रकार घडला

  • पालकांच्या तक्रारीनंतर बस चालकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

  • बसमध्ये महिला मदतनीस नसल्याने सुरक्षेवर प्रश्न निर्माण

  • घटनेनंतर पालकांमध्ये संताप

मयुरेश कडव, बदलापूर

Badlapur Minor Girl Physically Abused In School Bus बदलापूर शहर पुन्हा एकदा हादरलंय. एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा शाळेच्या स्कूलबसमध्येच बस चालकानं विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडलीय. महत्वाची बाब म्हणजे या स्कूल बसमध्ये कोणतीही महिला मदतीस नव्हती. या घटनेनंतर पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

बदलापूर शहरातील एका नामांकित खासगी शाळेत विद्यार्थ्यांची ने-आण करणारी ही स्कूल बस आहे. या विद्यार्थिनीला शाळेतून घरी सोडताना बस चालकानं बसमध्ये तिचा विनयभंग केला. यानंतर पीडित विद्यार्थिनीनं आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी थेट बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली.

त्यानंतर पोलिसांनी पोक्सो आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. काही दिवासांपूर्वी बदलापुरातल्या स्कूल व्हॅनमध्ये असाच प्रकार घडला होता. स्कूल व्हॅन चालकाने चार वर्षांच्या चिमुरडीचं लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली होती.

याप्रकरणातील आरोपीला अटक झाल्यानंतर आता पुन्हा तसाच प्रकार बदलापुरात घडलाय. महत्वाचं म्हणजे कालच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी बदलापूरचा दौरा करत शाळांच्या सुरक्षेबाबत आढावा घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Recipe : झटपट वजन कमी करायचंय? रोज सकाळी करा 'हा' हेल्दी नाश्ता, पोट दीर्घकाळ भरलेले राहील

Maharashtra News Live Update: बारामती पोटनिवडणुकीसाठी आजपासून प्रचाराला सुरूवात

IPL CSK vs DC: अखेर चेन्नई सुपर किंग्सनं उघडलं विजयाचं खातं; सॅमसन-ओव्हरटन ठरले हिरो

Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांच्या नातनं दिली आजीच्या प्रकृतीची अपडेट; काय म्हणाली जनाई?

Sahyadri Express Loot: सिग्नलमध्ये बिघाड करुन सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा; प्रवाशांचे मोबाईल, सोने लुटले

SCROLL FOR NEXT