Badlapur Protest Lathi Charge Saam Tv
मुंबई/पुणे

Badlapur Protest: गिरीश महाजन यांच्या दिशेने काचेची बाटली फेकण्याचा प्रयत्न, त्यामुळे लाठीमार: दीपक केसरकर

Badlapur Protest Lathi Charge: बदलापूर स्टेशनवर रेल्वे रोको आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज का केला याची माहिती शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी दिलीय.

Bharat Jadhav

आंदोलन मागे घ्यावे, यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. मात्र आंदोलक आपल्या मागणीवर ठाम होते, त्याचवेळी काही आंदोलकांनी त्यांच्यावर पाण्याच्या बाटल्या फेकल्या त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलीय. केसरकरांच्या या दाव्यामुळे राजकरणात मोठी खळबळ उडालीय.

बदलापूरमधील शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. या गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी बदलापूर रेल्वे स्टेशनवर नागरिकांनी आंदोलन केले. बदलापूरकरांनी आपल्या मागणीसाठी तब्बल ११ तास रेल्वे रोको केला. आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आंदोलनस्थळी मंत्री गिरीश महाजन आले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली, त्याच्या सर्व मागण्या मान्य करत त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र आंदोलक आपल्या मागण्यावर ठाम होते, आणि त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. मंत्री गिरीश महाजनाशी चर्चा झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना घेरत त्यांच्यावर लाठीचार्ज केला.

लाठीचार्ज केल्यानंतर विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. पोलिसांनी लाठीचार्ज का केला असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर पोलिसांनी आपलं स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर आता मंत्री दीपक केसरकर यांनी लाठीचार्जचा निर्णय का घ्यावा लागला त्यामागील कारण माध्यमांना सांगितलंय. आंदोलन करणाऱ्यांमधील एकाने काचेची बाटली गिरीश महाजन यांच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न केला. म्हणून लाठीचार्ज करण्यात आला, बाटली फेकली नसती तर आज आंदोलन शांततेत संपलं असतं, अशी माहिती मंत्री दीपक केसकर यांनी दिली. आंदोलकांनी बॉटल फेकल्यामुळे लाठीचार्ज करावा लागल्याची माहिती केसरकर म्हणालेत.

..तर लाठीचार्ज करावा लागला नसता

मी आताच बदलापूरला जाऊन आलो असून शाळेला भेट दिली. विद्यालयाचे ट्रस्टी, हेडमास्तर, सर्वांची भेट घेतली चर्चा केली. आपण आंदोलकांना भेटणार होतो. भेटलो असतो तर लाठीचार्ज टाळता, येईल असे आपण निर्णय घेतले होते. ते जर त्यांना समजले असते तर त्यांच समाधान झाल असतं, असं दीपक केसरकर म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT