Badlapur Railway Station : Saam tv
मुंबई/पुणे

Badlapur : बदलापूरकरांनो इकडे लक्ष द्या, प्लॅटफॉर्म क्रमांक १ कायमस्वरूपी बंद होणार, प्रवाशांमध्ये संतापाची लाट

Badlapur Platform 1 shutdown : मध्य रेल्वेचा बदलापूरकरांवर तुघलकी निर्णय! प्लॅटफॉर्म क्रमांक एक कायमस्वरूपी बंद करण्याच्या निर्णयामुळे प्रवाशांत संतापाचं वातावरण. पूर्वेकडील नागरिकांचे हाल सुरू.

Namdeo Kumbhar

मयुरेश कडव, बदलापूर प्रतिनिधी

Badlapur platform closure, Central Railway decision : मध्य रेल्वेच्या तुघलकी कारभाराचा बदलापुरातील रेल्वे प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. कारण रेल्वे प्रशासनानं बदलापूर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एक कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतलाय. तुघलकी निर्णयामुळे प्रवाशांची फरफट होणार आहे. रेल्वेच्या निर्णयाविरोधात प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळलीय.

मध्य रेल्वेच्या बदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एक कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी घेण्यात आला होता. मात्र प्रवाशांनी त्याला कडाडून विरोध केल्यानंतर रेल्वेकडून या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनानं जुनाच घाट घातलाय. मेगाब्लॉक घेऊन प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर बॅरिकेटिंग केलं जाणार आहे. याची प्रवाशांमध्ये कुठेही वाच्यता होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून गोपनीयता पाळण्यात येत आहे.

सध्या अस्तित्वात असलेला प्लॅटफॉर्म क्रमांक एक हा कायमस्वरूपी रेलिंग लावून बंद करण्यात येणार असल्याने बदलापूर पूर्वेकडे राहणाऱ्या प्रवाशांना मोठी फरफट होणार आहे. इतकच नाही तर पूर्वेकडील प्रवाशांना पश्चिमेकडे जाऊन मग प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून म्हणजे सध्याच्या होम प्लॅटफॉर्मवरून गाडी पकडावी लागेल. होम प्लॅटफॉर्मच्या नावाखाली मध्य रेल्वे प्रशासनानं बदलापूरकरांची केलेली ही मोठी फसवणूक असून याविरोधात बदलापुरातील रेल्वे प्रवासी अत्यंत आक्रमक भूमिका घेण्याच्या मनस्थितीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT