Badlapur Hanuman Mandir Dress Code 
मुंबई/पुणे

Dress Code : बदलापूरच्या या मंदिरात ड्रेस कोड लागू, अंगभर कपडे घालून आला तरच प्रवेश

Badlapur Hanuman Mandir Dress Code : बदलापूर येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. अंगभर कपडे असतील तरच मंदिरात प्रवेश दिला जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

मयुरेश कडाव

Badlapur Hanuman Mandir Temple Dress Code : राज्यभरात आज महाशिवरात्राचा उत्सव सुरू आहे, प्रत्येक शिव मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असतानाच बदलापूरमधील हनुमान मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. अंगभर कपडे असतील, तरच मंदिरात प्रवेश मिळेल, असा निर्णय घेण्यात आला आहे. (Badlapur Temple Introduces Dress Code)

बदलापुरातल्या गांधी चौकातील हनुमान मंदिरात ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. हाफ पॅन्ट, मिनी स्कर्ट घालून आल्यास मंदिरात प्रवेश मिळणार नाही. त्याशिवाय मंदिर परिसरात पाळीव प्राणी आणण्यासही मनाई घालण्यात आली आहे. मंदिराच्या या निर्णयाचे काही जणांनी कौतुक केलेय, तर काही जणांनी विरोध दर्शवला आहे.

बदलापुरातल्या गांधी चौकातील प्रसिद्ध हनुमान मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आलाय.यापुढे मॅक्सी, हाफ पँट, मिनी स्कर्ट्स, मीडी स्कर्ट्स,फाटलेल्या जीन्स घालून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. तसा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतला आहे. तसंच मंदिर परिसरात पाळीव पाणी आणण्यास मनाई करण्यात आलीय. ड्रेस कोड बाबतचा फलकही मंदिराबाहेर लावण्यात आलाय.

गांधी चौकातील हनुमान मंदिर हे बदलापुरातील जुनं मंदिर असून या ठिकाणी दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात, मंदिराचं पावित्र्य जपण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येतय. बदलापूर हे चाकरमान्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं. बहुतांश बदलापूरकर हे नोकरी कामधंद्यानिमित्त मुंबईला जात असतात. त्यामुळे मंदिर प्रशासनानं लागू केलेल्या ड्रेस कोडच्या निर्णयाचं भाविक स्वागत करतात, की विरोध हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT