Badalapur Case Accused Akshay Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Badlapur Case: दोषी असेल तर फासावर लटकवा, आरोपी अक्षय शिंदेची आई संतापली

Badalapur Case Accused Akshay Shinde: आरोपीने गेल्या २ वर्षांत तीन वेळा लग्न केले असून त्याची तिसरी पत्नी पाच महिन्यांची गरोदर आहे. तर आरोपी अक्षयची आई त्याच शाळेत वेगळ्या विभागामध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करते.

Priya More

माझ्या मुलाने काही चूक केली असेल तर न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी प्रतिक्रिया बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील (Badlapur Case) आरोपी अक्षय शिंदेच्या आईने दिली आहे. माझ्या मुलाने त्या मुलींवर अत्याचार केले असावे असे मला वाटत नाही. आरोपीने गेल्या २ वर्षांत तीन वेळा लग्न केले असून त्याची तिसरी पत्नी पाच महिन्यांची गरोदर आहे. तर आरोपी अक्षयची आई त्याच शाळेत वेगळ्या विभागामध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करते.

अक्षय शिंदेचा छोटा भाऊ शाळेमध्ये नोकरी करत होता. तो वेगवेगळ्या विभागात शिपाई झाला. त्यानंतर त्यानेच अक्षयला या शाळेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून कामाला लावले. आरोपी अक्षय शिंदे बदलापूरच्या खरवई गावात आई, वडील, लहान भाऊ आणि भावाच्या पत्नीसोबत राहतो. शाळकरी मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर आरोपी अक्षय राहत असलेल्या खरवई गावातील त्याच्या घराची संतप्त नागरिकांनी तोडफोड केली. त्याच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्यामुळे पोलिसांनी खरवई गावातील त्याच्या घराजवळ पोलिस बंदोबस्त वाढवला आहे.

शाळेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करण्यापूर्वी अक्षय त्याच्या आईसोबत एका हाऊसिंग सोसायटीमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. आरोपीचे वय २४ वर्षे असले तरी देखील त्याचे तीन वेळा लग्न झाले आहे. आरोपीच्या पहिल्या दोन बायका लग्नानंतर लगेच सोडून गेल्या. त्याने तिसऱ्यांदा लग्न केले असून त्याची पत्नी गरोदर आहे. अक्षयचे शिक्षण दहावीपर्यंतच झाले असून तो घटना घडलेल्या बदलापूरमधील त्या शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. एका कंत्राटाद्वारे त्याला या शाळेत शिपाई म्हणून नोकरी मिळाली होती.badlapur

दरम्यान, बदलापूरमधील एका नामांकित शाळेमध्ये १२ ऑगास्टला सफाई कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केले. ही घटना १६ ऑगस्टला उघड झाली. या घटनेप्रकरणी आरोपी अक्षय शिंदेविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली. सध्या आरोपी पोलिस कोठडीमध्ये आहे. या घटनेची गंभीर दखल घेत महाराष्ट्र सरकारने चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली आहे. याप्रकरणात आरोपी दोषी आढळला तर त्याला साडेतेरा वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता असल्याची माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT