पुणे - आपल्या घरी जर लहान मुलं असतील तर सावधान कारण आपलं थोडंही दुर्लक्ष त्या मुलांच्या जीवावर बेतू शकतं, अशीच एक दुर्दैवी दुर्घटना पुण्यातील हडपसर येथील हिंगणे मळा मध्ये घडली आहे. हिंगणे मळ्यात राहणाऱ्या 28 वर्षीय महिला कालव्यावर कपडे धुण्यासाठी गेल्यानंतर, तिच्या पाठीमागे तिची अडीच वर्षाची मुलगी रांगत-रांगत कालव्या जवळ आली आणि पाण्यात पडली. ही गोष्ट तेव्हा कुणाच्याही लक्षात आली नाही.
हे देखील पहा -
कपडे धुऊन महिला घरी आल्यानंतर आपली अडीच वर्षाची मुलगी दिसत नसल्यामुळे सैरावैरा झालेल्या आईने सगळीकडे आपल्या मुलीची शोध घेतला. मात्र मुलगी कुठेच सापडत नव्हती शेवटी पोलिसात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केल्यानंतर, हडपसर पोलिसांनी मिसींगचा तपास सुरू केला.
पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर अडीच वर्षीय मुलीचा मृतदेह पुणे जिल्ह्यातील यवत याठिकाणी सापडला. यवत पोलिसांनी हडपसर पोलिसांशी संपर्क साधला. मृतदेह त्रीशिकाचा असल्याची ओळख पटल्यानंतर मुलीचा नेमका मृत्यू कसा झाला याचा पोलीस शोध घेत असताना एक धक्कादायक माहिती समोर आली. त्रीशिका रांगत पाण्यात पडत असतानाची घटना कालव्या जवळ असणाऱ्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्रिशिकाच्या आईच्या एका छोट्याशा चुकी मुळे निष्पाप त्रिशिकाला आपला जीव गमवावा लागला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.