Baba Siddique  SAAM TV
मुंबई/पुणे

Firing on Baba Siddique : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक

Baba Siddique news : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतून मोठी बातमी हाती आली आहे. मुंबईत अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात ही घटना घडली आहे. गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात खेरनगर येथील राम मंदिर परिसरात बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला आहे. तीन ते चार तरुणांनी गोळीबार केल्याची माहिती हाती आली आहे. वांद्रे येथील या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. बाबा सिद्धिकी यांच्यावर नेमकं कोणी आणि का गोळीबार केला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

वांद्रे परिसरातील गोळीबारात बाबा सिद्धिकी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी बाबा सिद्धिकी यांना पुढील उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बाबा सिद्धिकी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

गोळीबार करणारे दोघे ताब्यात

बाबा सिद्धिकी यांच्यावर शनिवारी रात्री ९.१५ च्या सुमारास गोळीबार झालाय. बाबा सिद्धिकी यांच्या छातीला गोळी लागल्याची माहिती मिळत आहे. बाबा सिद्धिकी यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salher Fort : ट्रेकिंग प्रेमींनो! सह्याद्रीतील उंच शिखरावरचा शौर्याचा साक्षीदार साल्हेर किल्ल्याला भेट दिलीत का?

Kidney Failure: रिकाम्या पोटी पेनकिलर घेतल्याने किडनी निकामी होते? जाणून घ्या सत्य

Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाचे सर्च ऑपरेशन, किश्तवाडमध्ये जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यातील ६३ धोकादायक पूल पाडणार

Kitchen Vastu Tips: किचनमधील 'या' गोष्टीमुळे होतो वास्तुदोष, घरात वाढते नकारात्मक उर्जा

SCROLL FOR NEXT