Baba Siddique  Saam tv
मुंबई/पुणे

Baba Siddique : 'मी आजही काँग्रेससोबतच, पण...'; अजित पवार गटात जाण्याच्या चर्चांवर बाबा सिद्धीकी स्पष्टच बोलले

Baba Siddique News: राजकीय वर्तुळातील चर्चेचं खुद्द बाबा सिद्धीकी यांनी खंडन केले. 'मी आजही काँग्रेस सोबतच आहे. पण भविष्याचं काही सांगता येणार नाही', असं वक्तव्य बाबा सिद्धीकी यांनी केलं आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे, मुंबई

baba siddique Latest News:

राज्यात मिलिंद देवरा यांच्यानंतर काँग्रेसचा आणखी नेता पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरु आहे. काँग्रेस नेते बाबा सिद्धीकी आणि त्यांचे सुपुत्र आमदार झिशान सिद्धीकी अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या राजकीय वर्तुळातील चर्चेचं खुद्द बाबा सिद्धीकी यांनी खंडन केले. 'मी आजही काँग्रेस सोबतच आहे. पण भविष्याचं काही सांगता येणार नाही', असं वक्तव्य बाबा सिद्धीकी यांनी केलं आहे. (Latest Marathi News)

काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मी काँग्रेस सोबतच स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर त्यांनी भविष्याचं काही सांगता येणार नसल्याचे स्पष्ट करत अजित पवार गटातील प्रवेशाबाबत सस्पेन्स वाढवला आहे. अजून काही ठरलेलं नाही असं काहीच नाही. भविष्याबद्दल काही सांगता येत नाही, पण जाईल तेव्हा तुम्हाला सांगून जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अजित पवारांशी आमचे कौटुंबीक संबंध : बाबा सिद्दीकी

'अजित पवार यांच्यासोबत आमचे संबंध कौटुंबीक आहेत.', असेही त्यांनी पुढे सांगितले. 'तुम्ही त्यांना विचारा पण अजित पवार मुलाखात कुठे झाली, अशा विषयात काही चर्चा झाली नाही. भविष्यात काय होईल बे मी सांगण्यासाठी ज्योतिषी नाही, असे बाबा सिद्धीकी पुढे म्हणाले.

बाबा सिद्दीकी यांची अजित पवारांवर प्रतिक्रिया

'संजय राऊत वरिष्ठ नेते आहेत. मी सुद्धा 48 वर्षापासून काँग्रेसमध्ये आहे, कोण कोणत्या समाजाचा काळजी घेतो, यावर मी टिप्पणी करणार नाही. मी या विषयात गेलो, तर संजय राऊत यांना उत्तर द्यायला भारी पडेल, असे प्रत्युत्तर बाबा सिद्दीकी यांनी संजय राऊतांना दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बस कधी येणार? आता एका QR कोडवर मिळणार सगळी माहिती; 17 वर्षीय साईश्रद्धाची भन्नाट कल्पना, परिवहन मंत्र्यांनी थेट नोकरीवर घेतले

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक यांचा पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवर ठिय्या

घराच्या प्रवेशद्वारावर 'या' तीन गोष्टी ठेवल्यानं दूर होईल आर्थिक चणचण; घरात येईल समुद्धी

Plane Crash: उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांत विमान कोसळलं, ८ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT