Aurangabad Crime News नवनीत तापडिया
मुंबई/पुणे

कार्यालयात महिला येताच फिरवायचा नग्न प्रतिमेवर हात, महावितरण अधिकाऱ्यावर गुन्हा

'औरंगाबादेत महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याने एका महिलेचा विनयभंगाचा केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवनीत तापडिया -

औरंगाबाद: औरंगाबादेत (Aurangabad) महावितरणचा अधीक्षक अभियंत्याने त्याच्या कार्यालयात एका महिला अधिकाऱ्याच्या विनयभंगाचा केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. प्रवीण दरोली (५१) असं आरोपी अधीक्षक अभियंत्याचे नाव आहे.

आरोपी दरोले हा त्याच्या कार्यालयामध्ये महिला येताच, टेबलवर ठेवलेल्या पेपरवेटच्या आकारातील नग्न अवस्थेतील महिलेच्या स्टीलच्या कोरीव प्रतिमेवरून हात फिरवायचा, महिलांकडे वाईट नजरेने पाहत बसायचा.

पाहा व्हिडीओ -

पीडित महिला काही कामानिमित्त अधीक्षक अभियंता दरोलीच्या केबिनमध्ये गेल्यावर त्याने नेहमीप्रमाणे आपल्या टेबलवर ठेवलेल्या पेपरवेटच्या आकाराच्या नग्नावस्थेतील महिलेच्या स्टीलच्या कोरीव प्रतिमेवरून मुद्दाम हात फिरवायचा तसेच वाईट नजरेने पाहायचा.

ही बाब पीडितेला अनेकदा खटकली. मात्र, सुरुवातीला पीडितने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. परंतु, दिवसेंदिवस हा प्रकार वाढत गेल्याने पीडितेने अखेर एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून दरोली यांच्याविरुद्ध विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope : तुमच्या साधेपणाचा दुसरा कोणी फायदा घेण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांनी काळजीपूर्वक निर्णय घ्या, अन्यथा

शिंदे वर्षावर जाऊन फडणवीसांची मालिश करता का? संजय राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल|VIDEO

Pastry: ओव्हनची काय गरज कुकरमध्येच बनवा टेस्टी न्यू इयर स्पेशल पेस्ट्री केक, वाचा सोपी रेसिपी

Bajrang Dal Vandalism Mall: बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा राडा; धर्म विचारून रायपुरच्या मॅग्नेटो मॉलमध्ये तोडफोड

Old Is Gold उमेदवारीचा भाजपचा फाॅर्म्युला ठरला, त्या नगरसेवकांना पुन्हा संधी|VIDEO

SCROLL FOR NEXT