Attempting to urinate by beating a woman over a minor dispute in pimpri chinchwad Saam Tv
मुंबई/पुणे

संतापजनक! किरकोळ वादातून महिलेला मारहाण करत लघवी पाजण्याचा प्रयत्न

Pimpari-Chinchwad Crime News : आरोपीने पीडित महिलेला एका बाटलीमध्ये स्वतःची लघवी गोळा करून पाजण्याचा प्रयत्न केला आहे.

गोपाल मोटघरे

पुणे: पिंपरी-चिंचवड (Pimpari Chinchwad) शहरातील सुसगाव भागात एक अतिशय किळसवाणी घटना घडली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एका महिलेला आरोपीने स्वतःची लघवी (Urine) पाजण्याचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील पीडित महिला आणि तिचे सासरे चुलत सासऱ्याकडे जाऊन तुम्ही आम्हाला शिवीगाळ का केली? असा जाब विचारला असता तिचे चुलत सासरे शिवाजी भीमला जाधव याने महिलेला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. (Attempting to urinate by beating a woman over a minor dispute in pimpri chinchwad)

हे देखील पाहा -

हा वाद इथेच थांबला नाही, तर तिथे उपस्थित असलेल्या इतर आरोपीने फिर्यादी महिलेला चप्पल आणि काठीने मारहाण केली. त्यानंतर तिथेच भांडण सुरू असताना उपस्थित असलेला आरोपी अपील जाधव या आरोपीने फिर्यादी महिलेला एका बाटलीमध्ये स्वतःची लघवी गोळा करून पाजण्याचा प्रयत्न केला आहे. असं फिर्यादी महिलेने आपल्या तक्रारीत लिहिलं आहे.

या प्रकरणात पीडित महिलेच्या तक्रारीवरून हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये लघवी पाजण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी सोबत एकूण आठ जणांविरोधात विनयभंग आणि गर्दी करुन मारामारीचा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. या या प्रकरणात हिंजवडी पोलिसांनी शिवाजी भिमला जाधव, पिराजी जाधव, कपिल जाधव, अपिल जाधव, कविता शिवाजी, विद्या बाळू राठोड, अंगुरी कपिल जाधव आणि गुणाबाई पिराजी जाधव या आठ आरोपींविरोधात विनयभंग आणि गर्दी मारामारीचा गुन्हा दाखल केला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Transfer: महापालिका निवडणुकीआधीच बड्या IAS अधिकाऱ्याची बदली, अविनाश ढाकणे BMC चे नवे अतिरिक्त आयुक्त

Maharashtra Politics : भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; चव्हाणांकडून बालेकिल्ल्याला खिंडार, VIDEO

Shocking: सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या, नव्या घरात घेतला गळफास; १० पानी सुसाईड नोटमध्ये लिहिलं धक्कादायक कारण...

Vladimir Putin: परम बलशाली पुतीनची महिला ब्रिगेड, रशियातील 10 शक्तीशाली महिला

MahaYuti Face Clash: महायुतीत वाहताहेत स्वबळाचे वारे; निवडणुकीआधी भाजप-सेना युती तुटणार?

SCROLL FOR NEXT