Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Attacked on Girl in Pune : कोयत्याने वार होत असतानाही मैत्रिणीसाठी 'तो' ढाल बनला, आभार मानताना पीडितेच्या आईला अश्रू अनावर

Pune Crime News : शंतून जाधव असं आरोपीचं नावं आहे. आरोपी आणि तरुणी आधीपासून एकमेकांना ओळखतात.

साम टिव्ही ब्युरो

Pune News : एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीवर कोयत्याने वार केल्याची घटना पुण्यातून समोर आली आहे. मंगळवारी सकाळी सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलीस चौकीजवळ ही घटना घडली. या घटनेत तरुणी थोडक्यात बचवली आहे. तर तिच्यासोबत असलेला मित्रही यात जखमी झाला आहे.

शंतून जाधव असं आरोपीचं नावं आहे. आरोपी आणि तरुणी आधीपासून एकमेकांना ओळखतात. मंगळवारी सकाळी मित्राच्या स्कूटीवरुन तरुणी कॉलेजला जात होता. त्यावेळी शंतनू अचानक दोघाच्या समोर आला. काही क्षणात आरोपीने बॅगेतून कोयता काढला आणि हल्ला केला.

त्यावेळी तरुणीसोबत असलेल्या तिच्या मित्राने मधे येत शंतनूचा प्रतिकार केला. यात तोही जखमी झाला. त्यानंतर शंतनू तरुणीच्या दिशेने धावला असता तरुणीनेही पळ काढला. दरम्यान आजूबाजून लोक जमा झाले आणि तेही मदतीला धावले. त्यामुळे ही तरुणा या हल्ल्यात थोडक्यात बचावली आहे. पुणे पोलिसांनी आरोपी शंतनूला अटक केली आहे. दोघेही एकमेकांना आधीपासून ओखळतात.

...तर माझी मुलगी दिसली नसती

पीडित तरुणीच्या आईने सांगितलं की, बऱ्याच दिवसांपासून तो (शंतनू) माझ्या मुलीला त्रास देत होता. मुलीनेही त्याला मला तुझ्यासोबत मैत्री ठेवायची नाही सांगितलं होतं. मात्र तो ऐकायला तयार नव्हता. याबाबत मी त्याच्या वडिलांकडेही तक्रार केली होती. त्यावेळी मी त्याला समजावतो असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतरही त्याने तिला धमकी दिली होती. (Crime News)

मुलीला धमकी दिल्यानंतर मी त्याला पोलिसात तक्रार करेल, असं म्हटलं. याचाच त्याला राग आला असावा. त्यामुळे त्याने तिच्यावर तिने जीवघेणा हल्ला केला. मात्र मुलीचा मित्र होता म्हणून आज ती वाचली आहे. नाहीतर माझी मुलगी दिसली नसती, असं सांगताना तरुणीच्या आईला अश्रू अनावर झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bomb Blast: बॉम्बस्फोटाने पाकिस्तान हादरला! आगीचे लोट, अंदाधुंद गोळीबार अन्..., ८ जण ठार, पाहा थरारक VIDEO

Maharashtra Live News Update: ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांना धक्का, शिंदे गटाची ताकद वाढली

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! २ नवी स्थानके लवकरच सुरू होणार; लोकलच्या फेऱ्याही वाढणार

Amravati : अमरावती शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक; मतदार नोंदणीला सुरवात, राजकीय पक्षांची लगबग

Dussehra History: नवरात्रीनंतर दसरा का साजरा केला जातो?

SCROLL FOR NEXT