इंटरनेट सेवा पुरविण्याच्या वादातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला Saam Tv
मुंबई/पुणे

इंटरनेट सेवा पुरविण्याच्या वादातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला

या प्राणघातक हल्ल्याची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

गोपाल मोटघरे

पुणे - रेसिडेन्शिअल सोसायटीत इंटरनेट सेवा पुरविण्याच्या वादातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या प्राणघातक हल्ल्याची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील असलेल्या गोमंतक हॉटेल या ठिकाणी ही घटना घडली आहे.

हे देखील पहा -

मयूर जाधव या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षावर तीन जणांनी मिळून चाकू, कोयता आणि लोखंडी हातोड्याने प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात मयुर मधुकर जाधव गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मयूरवर प्राणघातक हल्ला करणारे सुमित भुमकर, प्रतिक लोखंडे आणि एका अज्ञात आरोपी विरोधात वाकड पोलीस स्टेशन मध्ये खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयूर जाधव यांचा वाकड परिसरामध्ये मायक्रोस्काँन ऑरेंज ब्रोडबंड नावाची इंटरनेट कनेक्शन पुरवणारी कंपनी आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेला आरोपी सुमित भूमकर आणि प्रतीक लोखंडे यांनी वाकड परिसरातील रेसिडेन्शिअल सोसायटी मध्ये इंटरनेट सर्विस पुरविण्यासाठी मज्जाव केला होता. याच कारणावरून मयूर जाधव आणि सुमित भुमकर यांच्यात यापूर्वी जातीवाचक शिवीगाळ करून वाद झाले होते. मात्र अखेर या वादाच रूपांतर प्राणघातक हल्ल्यात झाल आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

सुधारित Form 6 ला मंजुरी दिलेली नाही; SIR प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT