अभिजीत देशमुख
कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणी वाढत आहेत. पोलीस स्टेशनमधील गोळीबार प्रकरणानंतर गणपत गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर आता गणपत गायकवाड यांच्याविरोधात उल्हासनगर-हिल लाईन पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.
कल्याणमधील द्वारली गावातील जमीन मालकाला जातीवाचक शब्द वापरल्याने आमदार गणपत गायकवाड यांच्यासह इतर सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
गणपत गायकवाड यांनी शुक्रवारी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. याप्रकरणी पोलिसांनी गणपत गायकवाड यांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने गणपत गायकवाड यांना १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जागेच्या वादातून पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहूल पाटील यांच्यावर पोलिस ठाण्यात गोळीबार केला. या प्रकरणी आमदार गायकवाड यांच्यासह आरोपींना अटक करण्यात आली. आमदारांसह आरोपींना ११ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
ज्या जागेवरुन वाद सुरु होता. या प्रकरणात भाजप आमदारासह आठ जणांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा जागा मालकाच्या तक्रारीवरुन दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आमदार गायकवाड यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावात ३१ जानेवारी रोजी जागेवरुन वाद झाला होता. जागा मालकाच्या कुटुंबियांसोबत भाजप आमदार गायकवाड यांचा वाद झाला होता.
यावेळी आमदारांसह सात जणांनी जागा मालक मधूमती एकनाथ जाधव आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलांना जातीवाचक शिवीगाळ केली होती. आमदार गणपत गायकवाड यांनी जातीचा उल्लेख करत तुम्ही कधी सुधारणार नाही असं म्हटलं. तुम्हाला आम्ही कधी पुढे जाऊ देणार नाही. तुमची जमीन घेतल्याशिवाय सोडणार नाही. तुम्ही तुमच्या जमिनीकरता कोणत्याही कोर्टात जा, असे बोलून पाणउतारा केला.
तसेच त्यांच्यासोबत असलेल्या अनेकांनी जातीवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणात हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गायकवाड यांच्यासह जितेंद्र पारीख, वि्ठठल चिकणकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकात ओल, मंगेश वारघेट यांच्या विरोधात अॅट्रोसिटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.