Atharva Sudame PMPML bus reel controversy Pune Saam Tv
मुंबई/पुणे

रील स्टार अथर्व सुदामे पुन्हा वादात; PMPL बसमधील रीलमुळे नोटीस

Atharva Sudame Ladies Bus Reel Sparks New Controversy: पुण्यातील रील स्टार अथर्व सुदामे पुन्हा वादात सापडला आहे. PMPML बसमध्ये परवानगीशिवाय शूट केलेल्या रीलमुळे महिलांच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचल्याचा आरोप होत असून महापालिकेकडून त्याला नोटीस बजावण्यात आली आहे.

Omkar Sonawane

पुण्यातला रील स्टार अथर्व सुदामे पुन्हा एकदा वादग्रस्त रीलमुळे अडचणीत आलाय. नेमकं काय घडलंय पाहूयात...

रीलस्टार अथर्व सुदामेचा रील वादात सापडलाय. अथर्वनं पुणे महापालिकेच्या PMPML बसमध्ये रीलचं शूट केलं. विशेष म्हणजे या रीलमध्ये अथर्व कंडक्टरच्या वेशात एका प्रवासी जोडप्याशी प्रवाशांशी संवाद साधतोय...

या रीलमुळे प्रवासी महिलांच्या प्रतिष्ठेला बाधा पोहचल्याचा आरोप अर्थववर करण्यात आलाय. विशेष म्हणजे अथर्वनं बसमध्ये शुटिंग करण्यासाठी महापालिकेची परवानगीही घेतली नसल्यानं त्याला नोटीस पाठवण्यात आलीय.

सात दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करून समाजमाध्यमावरून हा रील हटवण्याचे निर्देश अथर्वला दिले आहेत. त्यामुळे अथर्ववर दुसऱ्यांदा रील हटवण्याची नामुष्की ओढवणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makeup Tips: अजूनही नीट मेकअप करता येत नाही? मग रोज मेकअपसारख्या ग्लोसाठी लावा 'या' तीन गोष्टी

मुंबई हादरली! पिस्तुल काढलं अन् स्वत:वर धाड धाड गोळ्या झाडल्या, कांदिवलीत ४५ वर्षीय व्यक्तीचा टोकाचा निर्णय

TATA Sierra चं सर्वात स्वस्त मॉडेल कोणतं आहे?

Maharashtra Live News Update:आमदार सुरेश धस यांच्यावरील टीकेचा निषेध; आष्टीत सोशल फोरमचा 'टोणगा मोर्चा'

Buldhana Accident: नांदुरा- बुऱ्हाणपूर मार्गावर भीषण अपघात,भरधाव वडाप टॅक्सी खड्ड्यात उलटली

SCROLL FOR NEXT