Vidhan Parishad Election 2022  Saam Tv
मुंबई/पुणे

Political News : विधानसभा हक्कभंग समितीची घोषणा; ठाकरे गटाच्या एकाही आमदाराचा समितीत समावेश नाही

हक्कभंग समितीमध्ये ठाकरे गटाच्या एकाही आमदाराला जागा मिळालेली नाही.

साम टिव्ही ब्युरो

>> निवृत्ती बाबर

मुंबई : राज्याच्या विधानसभेच्या हक्कभंग समितीची निवड झालेली आहे. हक्कभंग समितीमध्ये आमदार राहुल कुल, अतुल भातखळकर, योगेश सागर, अमित साटम, नितेश राणे, अभिमन्यू पवार, संजय शिरसाठ, दिलीप मोहिते पाटील, सदा सरवणकर, माणिकराव कोकाटे, सुनिल भूसारा, नितीन राऊत, सुनिल केदार, विनय कोरे, आशिष जैस्वाल यांचा समावेश आहे. हक्कभंग समितीमध्ये ठाकरे गटाच्या एकाही आमदाराला जागा मिळालेली नाही. (Political news)

हक्कभंग समितीत भाजपचा वरचष्मा दिसत आहेत. 15 सदस्यांच्या हक्कभंग समितीच्या प्रमुखपदी आमदार राहुल कुल यांची निवड करण्यात आली आहे. इतर 14 सदस्यांमध्ये भाजप-शिंदेच्या मोठ्या आमदारांचा समावेश आहे. हक्कभंग समितीकडून आता उद्या संजय राऊत यांना नोटीस बजावली जाईल आणि त्यांच्याकडून उत्तर मागवलं जाणार आहे. त्यामुळे राऊतांच्या अडचणीत वाढ होणार अशी चिन्ह दिसत आहेत.

विधानसभेप्रमाणे विधानपरिषदेतीची समिती स्थापन केली जाईल. विधानसभेच्या समितीत ठाकरे गटाचा एखादा आमदार असायला होता. विधानसभा अध्यक्ष पक्षपातीपणे वागत आहेत. ठाकरे गटाचा आमदारही या समितीत असायला हवा होता, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. समितीत सर्वपक्षांना स्थान असायला हवं होतं. त्यामुळे हा ठाकरे गटावर अन्याय असल्याचं मनिषा कायंदे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhurandhar vs Avatar-Fire and Ash Collection : 'अवतार'च्या रिलीजनंतरही बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' ची हवा, रणवीरच्या चित्रपटाने किती कोटी कमावले?

Kitchen Hacks : फक्त १५ दिवसांत घरच्या घरी उगवा ताजी कोथिंबीर, फॉलो करा या भन्नाट टिप्स

Silk Saree Blouse Designs: सिल्क साडीवर शोभून दिसतील हे 5 ब्लाऊज पॅटर्न, डेली वेअरसाठी नक्की ट्राय करा

Gold Price Today: सोन्याच्या दरात वाढ झाली की घसरण; आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर किती?

Daily wear Mangalsutra Design: डेली वेअरसाठी 'हे' नाजूक आणि एलिग्नंट मंगळसूत्र डिझाईन, नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT