"गिरे तो भी टांग उपर" गोव्यामध्ये 'त्यांना' नोटा एवढे सुद्धा मतदान झाले नाही  SaamTvNews
मुंबई/पुणे

"गिरे तो भी टांग उपर" गोव्यामध्ये 'त्यांना' नोटा एवढे सुद्धा मतदान झाले नाही

उत्तर प्रदेशासह तीन राज्यात भाजपने मिळवलेल्या यशानंतर कल्याण, डोंबिवली आणि दिव्यात भाजप कार्यकर्त्यांनी आज जल्लोष केला.

प्रदीप भणगे

कल्याण : उत्तर प्रदेशासह तीन राज्यात भाजपने मिळवलेल्या यशानंतर  कल्याण, डोंबिवली आणि दिव्यात भाजप कार्यकर्त्यांनी आज जल्लोष केला.  कल्याण पूर्वेत भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेला (Shivsena) टोला हाणला आहे. गायकवाड यांनी पत्रकार यांच्याशी बोलताना सांगितले की महाराष्ट्र राज्यकारणात जे आहेत, गिरे तो भी टांग उपर, गोवा मध्ये त्यांना नोटा एवढे सुद्धा मतदान झाले नाही.

हे देखील पहा :

फक्त भाजप (BJP) पक्षाला विरोध करायचा म्हणून त्यांनी उमेदवार उभे केले. पण, त्यांना नोटा एवढे सुद्धा मतदान झाले नाही. असा टोला आमदार गायकवाड यांनी नाव न घेता सेनेला लगावला. डोंबिवलीमध्ये (Dombivli) देखील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी घरडा सर्कल ते गणपती मंदिरापर्यंत रॅली काढण्यात आली होती. रॅलीमध्ये गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येत होती. या रॅलीमध्ये राम मंदिराची प्रतिकृती असलेला रथ सहभागी झाला होता. यावेळी आमदार रवींद्र चव्हाण यांनी निवडणुकामध्ये भाजपाला घवघवीत यश मिळालं अयोध्येमध्ये श्रीरामाचे भव्य मंदिर बनवण्याच काम सुरू आहे आणि प्रत्येक डोंबिवलीकरांना हे काम लवकरात लवकर पूर्ण करावं असं वाटतं.

योगीजी (Yogi Adityanath) पुन्हा मुख्यमंत्री झाल्यामुळे आता राम मंदिराचे काम अधिक लवकर होईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे, म्हणून हा जल्लोष केला जातोय. नरेंद्र मोदींसोबत देशामधील सर्व नागरिक आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांनी दिली. दरम्यान डोंबिवली मध्ये रॅली काढल्याने ट्रॅफिक जाम झाले होते. तसेच उत्तर प्रदेश, गोवा, मणिपुर, उत्तराखंड या राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेलं घवघवीत यश पाहता भाजपा दिवा शहर तर्फे लाडू वाटून फटाक्यांच्या आतीषबाजी सह आनंदउत्सव साजरा करण्यात आला.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT