Asim Sarode claims Police Framed Khadse son-in-law saam tv
मुंबई/पुणे

Pune Rave Party: पोलिसांनीच कोकेन ठेवलं; 'दृश्यम'प्रमाणे चित्र रंगवलं अन् व्हिडीओ बनवला, असीम सरोदेंचा दावा

Asim Sarode claims Police Framed Khadse son-in-law: पोलिसांनी पुणे रेव्ह पार्टी प्रकरणी व्हिडिओ काढले. त्यांनी एका खासगी पार्टीला रेव्ह पार्टीचं रुप दिलं असा, आरोप अॅड. असीम सरोदे यांनी केला.

Bharat Jadhav

  • पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात वकील असीम सरोदे यांनी धक्कादायक आरोप केले आहेत.

  • पोलिसांनी कोकेन ठेवून बनावट सीन तयार केल्याचा गंभीर दावा त्यांनी केला आहे.

  • प्रकरणात अटकेत असलेल्या डॉ. प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांचे जावई आहेत.

  • ‘दृश्यम’सारखी रचना करून पोलिसांनी फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय.

एकनाथ खडसेंचे जावई डॉ.प्रांजल खेवलकरांच्या अटकेच्या प्रकरणावरून अॅड.असीम सरोदे यांनी पोलिसांना धारेवर धरले आहे. पोलिसांनी प्रांजल खेवलकर यांना अडकविण्याचा कट रचल्याचा दावा अॅड. असीम सरोदे यांनी केलाय. या प्रकरणी पोलिसांनी खासगी पार्टीला रेव्ह पार्टीचे स्वरुप दिलं, कोकेनचा पुरावा प्लॅन्ट करुन त्या लोकांना समाजापुढे आरोपी असल्याचं चित्र उभं केल्याचा दावाही त्यांनी केलाय.

पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टी प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यासह ६ जणांना अटक केलीय. न्यायलयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. याप्रकरणावरून अॅड.असीम सरोदे यांनी पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. पुणे पोलिसांनी राजकीय उद्देश ठेऊन दृश्यम चित्रपटाप्रमाणे खोटं चित्र रंगवाल्याचा दावा त्यांनी केलाय.

खासगी पार्टीला रेव्ह पार्टीचं रुप दिलं

पुणे पोलिसांनी खासगी पार्टीला रेव्ह पार्टीचं रुप दिल्याचं सरोदे म्हणालेत. यावेळी त्यांनी विश्वास नांगरे पाटील हे पुण्याचे पोलीस अधीक्षक असताना त्यांनी एका रेव्ह पार्टीवर धाड टाकली होती. रेव्ह पार्टीमध्ये मोठ्या आवाजातील संगीत असते, लोकांची मोठी संख्या असते. तेथे लोक हे अत्यंत तोडक्या कपड्यांमध्ये असतात. या पार्टीत अफू, गांजा अशा नशेच्या पदार्थांचा समावेश असतो. याला रेव्ह पार्टी म्हणतात.

पुणे पोलिसांनी जी कारवाई केली ती केस वेगळी आहे. यात सात लोकांना पकडण्यात आलं ते एका घरामध्ये दारू, बीयर पित होते. घरामध्ये दारू पिणे हा गुन्हा नाहीये. पण पोलिसांनी या प्रकरणाला राजकीय उद्देशाने रेव्ह पार्टीचे रुप दिल्याचं अॅड असीम सरोदे म्हणाले. प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. पोलिसांनी प्लांटेड पुराव्यांच्या आधारे डॉ. खेवलकर आणि इतरांना गुन्हेगार ठवरण्याचे कट रचण्यात आलाय.

जामीन मिळून नये यासाठी सात मिलिग्रॅम कोकेन जास्त भरलं पाहिजे, असा बंदोबस्त केलाय. पण पोलिसांनी दोन ग्रॅम कोकेन सापडल्याचा दावा केला, असा आरोप सरोदे यांनी केलाय. दृश्मय चित्रपटाप्रमाणे पोलिसांनी एक चित्र लोकांच्या मनावर बिंबवलंय. पोलिसांनी त्याची आधीच तयारी केली होती. पोलिसांनी त्याचा एक व्हिडीओ व्हायरल केल्याचे सरोदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded Flood: नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला|VIDEO

Potato Bhaji Recipe : बटाट्याच्या भाजीला द्या साऊथ इंडियन तडका, एक घास खाताच पाहुणे करतील कौतुक

Crime : गर्लफ्रेंडचा अंघोळ करताना व्हिडीओ बनवला, रागाच्या भरात बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्टच कापला

Manoj Jarange: मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मुस्लिम आणि बौद्ध समाजाचा पाठिंबा; आरक्षणासाठी ताफा मुंबईकडे|VIDEO

Maharashtra Live News Update: पुणे मेट्रोची वाहतूक आता रात्री २ वाजेपर्यंत

SCROLL FOR NEXT