Ashok Chavan saam tv
मुंबई/पुणे

Ashok Chavan : फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर काँग्रेस नेते अशोक चव्हाणांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले...

Ashok Chavan : देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीविषयी केलेल्या गौप्यस्फोटानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Dnyaneshwar Choutmal

Ashok Chavan : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीविषयी केलेल्या गौप्यस्फोटानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पहाटेचा शपथविधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतरच झाला, असा मोठा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला आहे. यावर बोलताना काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी पवार ज्येष्ठ नेते आहेत, ते असं कधी करणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.

अशोक चव्हाण म्हणाले की, देवेंद्रजींना हा साक्षात्कार निवडणुकीच्या तोंडावर कसा होतो? हा एक प्रश्न आम्हा सर्वांसमोर आहे. पवार साहेब खूप ज्येष्ठ नेते आहेत, खूप मुरब्बी नेते आहेत, ते असं कधी ही करणार नाहीत, असे चव्हाण म्हणाले.

अशोक चव्हाण म्हणाले की, शरद पवार यांची आजवरची कारकीर्द राहिलेली आहे. ते जी भूमिका घेतात ती खुलेआम घेतात. लपून छपून राजकारण करण्याचा त्यांचा स्वभाव नाही. फडणवीस यांनी केलेले विधान हे निवडणुकीच्या तोंडावर संभ्रम निर्माण करण्यासारखं आहे. पवार साहेबांसंदर्भात केलेले वक्तव्य चुकीचा आहे, असेही ते म्हणाले.

कसबा असो किंवा चिंचवड दोन्ही जागा या महाविकासआघाडीच्या निवडून येणार आहे. त्यामुळे भाजपला अशा प्रकारची रनणीती आखण्याचा दुर्दैवी प्रकार करण्याची वेळ येत आहे. यावर अजित पवार अधिक बोलू शकतील असे चव्हाण म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह याच्या पुणे दौऱ्याविषयी बोलताना चव्हाण म्हणाले, की केंद्रीय नेतृत्वाला पोटनिवडणुकीसाठी पाचारण करण्यात येत आहे. याचा अर्थ स्थानिक नेतृत्वाला प्रभाव पाडता येत नाही, असा टोला देखील चव्हाणांनी फडणवीसांना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News: बीडमध्ये दोन गट आमने-सामने; एका गटाकडून वाल्मिक कराडच्या नावाने घोषणाबाजी|VIDEO

Beed News : बीडमध्ये पोलीस अॅक्शन मोडमध्ये; बीडमधील नागरिकांना केलं मोठं आवाहन

Rava Masala Puri Recipe : गरमागरम चहा अन् रवा-मसाला पुरी, पावसात करा चटपटीत नाश्ता

Avneet Kaur: अवनीत कौरचा 'बोले चूड़ियां' लूक तुम्ही खास सोहळ्यासाठी करु शकता कॉपी

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाचं विसर्जन कधी होणार? मंडळाने वेळ सांगितली

SCROLL FOR NEXT