"महाविकास आघाडी सरकार म्हणजे; 'तीन पैशांचा तमाशा'' SaamTV
मुंबई/पुणे

"महाविकास आघाडी सरकार म्हणजे; 'तीन पैशांचा तमाशा''

'दोन वर्षातील 750 दिवस हे सरकार फक्त पुत्र, पुत्री आणि पुतण्या याभोवतीच फिरले. तीन पैशांचा तमाशा गेली दोन वर्षे सुरू असून सत्ता संपत्ती मिळविण्यासाठी अमानवी, अमानुष प्रयत्न केले गेले.'

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : भाजप आमदार आशिष शेलार MLA Ashish Shelar यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना महाविकास आघाडी सरकारवरती (MVA Goverment) टीका केली आहे. ते म्हणाले, 'महाराष्ट्रतील सरकार दोन वर्षे पूर्ण करत असल्याची जाहीरातबाजी सुरु आहे. तसेच मुख्यमंत्र्यांची तब्बेत व्यवस्थित होवो महाराष्ट्र सरकारच्या विकासाशी आमचे वैर नाही. टिकेला टीका करायची म्हणून आमच्या पत्रकार परिषदा नाहीत असंख्य वेदना महाराष्ट्रातील जनतेला दोन वर्षे भोगावे लागत आहेत. 2 वर्षाचे वर्णन करायचे झाले तर पुत्र पुत्री आणि पुतण्या यांच्याभोवती फिरणारे सरकार म्हणजे महाराष्ट्राचे सरकार असल्याची घणाघाती टीका शेलार यांनी केली.'

राज्यातील जनतेची कामे होणे अपेक्षित होते. मात्र '2 वर्षातील 750 दिवस हे सरकार फक्त पुत्र, पुत्री आणि पुतण्या याभोवतीच फिरले तसेच तीन पैशांचा तमाशा गेली दोन वर्षे सुरू असून सत्ता संपत्ती मिळविण्यासाठी अमानवी, अमानुष प्रयत्न केले गेले, 3 पक्षांचा सत्तेभोवतीचा लोभ 2 वर्षे राहिला तसेच हे सरकार जनता केंद्रित होण्यापेक्षा पुत्र-पुत्री-पुतण्या भोवतीच केंद्रित राहिले, असल्याचे वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केले.

आपला मुलगा राजकारणात स्थिर व्हायला पाहिजे यात चूक नाही पण राज्याच्या हिताचे निर्णय काय घेतले हे देखील सरकारने पहायला पाहिजे होते मात्र यांच्या निर्णयामुळे आणि पुत्र पुत्री प्रेमामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली असून प म्हणजे.. पार्टी, पब आणि पेंग्विन (Party, Pub and Penguin) इतकंच सरकार राहिले असल्याची खरमरीत टीका देखील त्यांनी यावेळी केली. शिवाय या सरकारने हॉटेलची वेळ वाढवली मात्र सरकारी कार्यालये वाढवली नाहीत असंही शेलार म्हणाले. सुपुत्रीचा आग्रह इतका होतो की राज्याच्या गृहमंत्रीपदी अनिल देशमुख (Anil Patil) यांना बसवावे लागले. गृहमंत्री आत गेले आणि राज्याच्या बदनामीची वेळ आली असही शेलार म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

SCROLL FOR NEXT